Friday, December 05, 2025 01:58:39 AM

Bomb Threat In Mahanagari Express: 'पाकिस्तान जिंदाबाद, ISI...'; दिल्ली स्फोटानंतर महानगरी एक्सप्रेसमध्ये आढळला धमकीचा संदेश

या गाडीत बॉम्ब असल्याचा संशय निर्माण करणारा एक धमकीचा संदेश आढळला, ज्यात “पाकिस्तान जिंदाबाद” आणि “आयएसआय” सारख्या घोषणांसह ट्रेनवर स्फोटक असल्याचा उल्लेख होता.

bomb threat in mahanagari express पाकिस्तान जिंदाबाद isi दिल्ली स्फोटानंतर महानगरी एक्सप्रेसमध्ये आढळला धमकीचा संदेश

Bomb Threat In Mahanagari Express: दिल्ली स्फोटानंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली असतानाच बुधवारी सकाळी महानगरी एक्सप्रेसमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या गाडीत बॉम्ब असल्याचा संशय निर्माण करणारा एक धमकीचा संदेश आढळला, ज्यात “पाकिस्तान जिंदाबाद” आणि “आयएसआय” सारख्या घोषणांसह ट्रेनवर स्फोटक असल्याचा उल्लेख होता. रेल्वे कर्मचाऱ्यांना हा संदेश दादर स्थानकावर गाडी थांबल्यानंतर दिसून आला. तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत कळवण्यात आले आणि काही मिनिटांतच रेल्वे पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला. वृत्तानुसार, एका अज्ञात व्यक्तीने महानगरी एक्सप्रेसच्या एका डब्याच्या शौचालयात "आयएसआय" आणि "पाकिस्तान जिंदाबाद" असे लिहिले होते. संदेशात "ट्रेनमध्ये बॉम्ब" असल्याचा इशारा देखील देण्यात आला होता.

हेही वाचा - Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोट तपासात मोठा ट्विस्ट; संशयित एक नव्हे तर दोन कारमध्ये आले होते

दरम्यान, सकाळी सुमारे 8:30 वाजता, महानगरी एक्सप्रेस भुसावळ स्थानकावर पोहोचताच रेल्वे संरक्षण दल (RPF) आणि रेल्वे पोलीस (GRP) यांनी संयुक्त तपासमोहीम हाती घेतली. श्वानपथक आणि बॉम्ब निकामी पथक (BDS) घटनास्थळी दाखल झाले आणि प्रत्येक डब्याची सखोल तपासणी सुरू झाली. प्रवाशांचे सामान, सीटखालील भाग आणि शौचालये सर्व ठिकाणी तपास करण्यात आला. सुमारे एक तास चाललेल्या तपासणीनंतर, कोणतेही स्फोटक पदार्थ आढळले नाहीत. त्यानंतर सकाळी 9 वाजता गाडीला पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली.

हेही वाचा - Delhi Blast Update: दिल्ली बॉम्बस्फोटाबाबत मोठा खुलासा; आरोपींचा जैश-ए-मोहम्मदशी थेट संबंध उघड

RPF अधिकाऱ्यांचा खुलासा

रेल्वे सुरक्षा निरीक्षक पी.आर. मीना यांनी सांगितले, “बॉम्ब निकामी पथकाने संपूर्ण तपासणी केली असून प्रवाशांची सुरक्षा पूर्णपणे सुनिश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार ही अफवा असण्याची शक्यता आहे, मात्र आम्ही सर्व कोनातून चौकशी करत आहोत.” देशभरात वाढलेल्या सुरक्षा चिंतेच्या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या तपास यंत्रणा संदेश लिहिणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री