कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी उपचारांचा येणारा खर्च हा मोठं आव्हान ठरतो. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. औषधांच्या किमतींमध्ये नेमका काय बदल होणार आणि रुग्णांना कसा फायदा मिळेल, जाणून घ्या.
औषधांच्या किमती घटणार
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सर्व विनानियंत्रि कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर आता 30 टक्कांची कमाल मर्यादा लागू करण्याची घोषणा केलेली आहे. यापूर्वी औषध कंपन्यांकडून अवाडवी नफा आकारला जात होता, त्यामुळे औषधे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.
हेही वाचा-मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी; घाटकोपर-वर्सोवा मार्गावर होणार महत्त्वाचा बदल
औषधं किती स्वस्त होणार?
केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे कॅन्सरच्या औषधांच्या कमाल किरकोळ विक्री किमतीमध्ये थेट 70 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळेच उपचाराचा येणारा लाखोचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि गरीब रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.