केंद्राचा कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा! औषधांच्या किमती कमी होणार; किती टक्क्यांनी मिळणार कपात?

Cancer Medicine : कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरील उपचारांचा वाढता खर्च रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मोठी चिंता ठरत आहे. अशा परिस्थितीत औषधांच्या किमतींबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, या निर्णयामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

केंद्राचा कॅन्सर रुग्णांना मोठा दिलासा! औषधांच्या किमती कमी होणार; किती टक्क्यांनी मिळणार कपात?
Big Update for Cancer Patients in India

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णांसाठी उपचारांचा येणारा खर्च हा मोठं आव्हान ठरतो. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारच्या नव्या निर्णयामुळे रुग्णांना आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. औषधांच्या किमतींमध्ये नेमका काय बदल होणार आणि रुग्णांना कसा फायदा मिळेल, जाणून घ्या.

औषधांच्या किमती घटणार
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने सर्व विनानियंत्रि कॅन्सर औषधांच्या ट्रेड मार्जिनवर आता 30 टक्कांची कमाल मर्यादा लागू करण्याची घोषणा केलेली आहे. यापूर्वी औषध कंपन्यांकडून अवाडवी नफा आकारला जात होता, त्यामुळे औषधे सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली होती.

हेही वाचा-मुंबई मेट्रो प्रवाशांसाठी मोठी बातमी; घाटकोपर-वर्सोवा मार्गावर होणार महत्त्वाचा बदल

औषधं किती स्वस्त होणार?
केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे कॅन्सरच्या औषधांच्या कमाल किरकोळ विक्री किमतीमध्ये थेट 70 टक्क्यांपर्यंत मोठी घसरण होण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. त्यामुळेच उपचाराचा येणारा लाखोचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि गरीब रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number