माजी मुख्यमंत्र्यावर गोळीबार, लग्नसमारंभातून बाहेर पडताना घडला प्रकार, घटना CCTV मध्ये कैद

सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

माजी मुख्यमंत्र्यावर गोळीबार, लग्नसमारंभातून बाहेर पडताना घडला प्रकार, घटना CCTV मध्ये कैद

जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे संरक्षक डॉ. फारुख अब्दुल्ला यांच्यावर गोळीबार झाला आणि ते या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ते बुधवारी (११ मार्च) जम्मूच्या ग्रेटर कैलाश भागात एका वकिलाच्या लग्नाला उपस्थित होते. गोळीबार करणाऱ्या आरोपीचे नाव कमल सिंग जामवाल असे आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आहे आणि पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर आरोपी झुडपांमध्ये लपून बसला होता, मात्र सुरक्षाकर्मचाऱ्यांनी त्याला पकडलं. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.फारूक अब्दुल्ला यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सुरक्षा रक्षकांनी पकडलं आहे. कमल सिंह जमवाल असं त्याचं नाव असून पोलिसांनी आता त्याला ताब्यात घेतलं आहे.

हेही वाचा – SIPRI Report : भारत जगातील दुसरा सर्वात मोठा शस्त्रास्त्र खरेदीदार! स्वयंपूर्णतेपासून खूप दूर; तर, चीन टॉप-10 मधून बाहेर 

या गोळीबाराच्या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. आरोपी कमल सिंग जामवाल हा जम्मूचा रहिवासी आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये आरोपी फारुख अब्दुल्ला यांच्याकडे जाऊन गोळीबार करताना दिसत आहे. त्याने गोळीबार करताच घटनास्थळी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याला शांत केले.

हेही वाचा – Prakash Ambedkar: ‘इराणशी मैत्री केली असती तर तेल मिळालं असतं…’; इंधन टंचाईनंतर प्रकाश आंबेडकरांचा मोदी सरकारवर निशाणा 

फारुख अब्दुल्ला यांना सुरक्षा देण्यात आली आहे.  हल्ला झाला तेव्हा  त्यांच्यासोबत जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी होते. चौधरी यांना गोळीबारामुळे किरकोळ दुखापत झाली आणि त्यांना वैद्यकीय मदत देण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number