Sunday, January 25, 2026 08:45:12 AM

Indian Air Force: सुखोई-राफेलची धमक पाहून पाकिस्तान गोंधळला; भारताचा जबरदस्त प्रत्युत्तर सराव

ऑपरेशन सिंदूरनंतर भारत, फ्रान्स आणि युएईच्या संयुक्त हवाई सरावामुळे पाकिस्तानचा तणाव वाढल्याचे दिसून येत आहे.

indian air force सुखोई-राफेलची धमक पाहून पाकिस्तान गोंधळला भारताचा जबरदस्त प्रत्युत्तर सराव

जामनगर: ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची घाबरलेली अवस्था आता लपून राहिलेलीच नाही. भारताने केलेल्या प्रत्युत्तराने पाकिस्तानला जणू कुणीतरी आरसा दाखवला आहे. स्वतःवरचा ताबा सुटलेल्या या देशावर भारत कधीही विश्वास ठेवू शकत नाही कारण दगाफटका करणे हीच पाकिस्तानची वर्षानुवर्षांची सवय बनली आहे. अफगाणिस्तान सीमेजवळ पाकिस्तान सैन्य उगाचच दादागिरी दाखवत हल्ले करत आहे, जणू स्वतःच्या अपयशाची राख दुसऱ्यांच्या अंगावर फेकून ते त्यांचा देशाची लाज झाकू पाहत आहेत.

भारत, फ्रान्स आणि युएई यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या भव्य हवाई लढाऊ सरावाची पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांची धडकी भरवली आहे कारण हा सराव नेमका पाकिस्तानच्या सिमेजवळच होत असून, भारताची ताकद त्यांना अक्षरशः डोळ्यांसमोर दाखवली जात आहे. सुखोई-30 MKI, जग्वार, IL-78 एअर-टँकर आणि AEW&C यांची भव्य तुकडी जामनगर आणि नलियाहून उड्डाण करताच पाकिस्तानची झोप उडाली आहे. “आता भारत आपल्यावर हल्ला करेल का?” या भीतीनेच त्यांचा थरकाप उडाला आहे.

हेही वाचा: H1B Visa Appointments: H-1B अर्जदारांवर मोठा फटका; अमेरिका करणार सोशल मीडिया तपासणी, अपॉइंटमेंट मार्चपर्यंत स्थगित

अल-धाफ्रा तळावरून येणारी फ्रान्स आणि युएईची राफेल व मिराज विमाने भारतासोबत युद्धाभ्यास करतायत, ही गोष्ट पाकिस्तानसाठी आणखी चटका देणारी आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे वाढते संरक्षणसहकार्य पाकिस्तानसारख्या अविश्वसनीय राष्ट्राला स्पष्ट संदेश देते, की दक्षिण आशियातील सामरिक वास्तव काय आहे आणि कोणत्या देशाची कुवत नेमकी किती आहे. भारताने जाहीर केलेल्या NOTAM नुसार कराचीपासून अवघ्या 200 नॉटिकल मैलांवर हा सराव होतोय, हे पाकिस्तानसाठी खऱ्या अर्थाने डोळे पांढरे करणारे आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या युद्धाभ्यासात प्रगत लढाऊ कौशल्ये, वेगवान प्रतिसाद आणि रणनीतींचे प्रदर्शन होणार आहे. भारताचे आधुनिकीकृत हवाई सामर्थ्य आणि सहयोगी देशांची तांत्रिक साथ मिळून हा सराव पाकिस्तानला दाखवून देतो की भारत आपल्या सुरक्षेबाबत कोणताही तडजोडीचा विचार करत नाही. पाकिस्तान कितीही कुरापती काढत राहिला, तरी भारताचे हवाई सामर्थ्य त्यांना प्रत्येक वेळी गप्प बसवण्यासाठी पुरेसे आहे.

पाकिस्तानने कितीही नाटक केले किंवा कितीही देशांचे पाय पकडले, तरी वास्तव एकच आहे की, भारताच्या शक्तीसमोर त्यांची सर्व मोहीमा आणि दिखावा फोल ठरतो. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की शत्रूला प्रत्युत्तर द्यायचे असेल, तर भारतीय हवाई दलाला तोड नाही. पाकिस्तान काहीही कुरकुर करो, परंतु या सरावाने पुन्हा एकदा पाकिस्तानाच्या पायाखालची जमीन सरकली आहे!

हेही वाचा: Australia Social Media Ban: ऑस्ट्रेलियात मुलांसाठी सोशल मीडिया लॉकडाऊन; 16 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर पूर्ण बंदी


सम्बन्धित सामग्री