कोर्टाचा मोठा निर्णय! ‘निळा ड्रम’प्रकरणातील आरोपी मुस्कान आणि साहिलला फाशीची शिक्षा; सौरभ राजपूतच्या कुटुंबीयांना अखेर न्याय मिळाला

याआधी 30 सप्टेंबर रोजी न्यायालयाने मुस्कान आणि साहिलला सौरभची एकत्रितपणे हत्या केल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे अवशेष निळ्या ड्रममध्ये लपवल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवले होते.
Blue Drum Case
Blue Drum Case

Saurabh Rajput Murder Case Death Sentence Meerut Court: देशभर खळबळ उडवून देणाऱ्या आणि ‘निळा ड्रम मर्डर केस’ म्हणून कुख्यात असलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणात मेरठच्या एका विशेष न्यायालयाने बुधवारी अत्यंत कठोर आणि ऐतिहासिक निकाल सुनावला आहे. या चर्चित खटल्यातील मुख्य दोषी ठरवण्यात आलेली मुस्कान रस्तोगी आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल शुक्ला यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. पतीची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे सिमेंटने भरलेल्या निळ्या ड्रममध्ये लपवल्याप्रकरणी हा कठोर निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयानंतर कायदेशीर वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. दोषींना आता उच्च न्यायालयात (upper court) अपिल करण्याची संधी उपलब्ध आहे.

589 दिवसांनंतर लागला निकाल; 30 सप्टेंबरला ठरवले होते दोषी
हत्येच्या या थरारक घटनेनंतर तब्बल 589 दिवसांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आणि 126 न्यायालयीन सुनावण्या तसेच 22 महत्त्वाच्या साक्षीदारांचे जबाब नोंदवल्यानंतर हा निकाल सुनावण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी तब्बल 1,000 पानांचे विस्तृत आरोपपत्र (Chargesheet) न्यायालयात दाखल केले होते. याआधी 30 सप्टेंबर रोजी न्यायालयाने मुस्कान आणि साहिलला सौरभची एकत्रितपणे हत्या केल्याचा आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेहाचे अवशेष निळ्या ड्रममध्ये लपवल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यामुळे दोषी ठरवले होते. सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, अशा स्वरूपाचे गंभीर आणि क्रूर अपराध समाजात प्रचंड भीती निर्माण करतात आणि न्यायव्यवस्थेवरील सर्वसामान्य लोकांचा विश्वास डळमळीत करतात.

हेही वाचा – भोळा चेहरा, पण कारनामे भलतेच! बसमध्ये महिलांचा खेळ संपला; नक्की घडलं काय?

खुनानंतर मुस्कान-साहिल शिमला-मनालीला फिरत इन्स्टाग्रामवर पोस्ट
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सौरभ राजपूत हे मर्चंट नेव्हीचे माजी अधिकारी होते आणि काही काळापूर्वीच लंडनहून परतले होते. 3 मार्च 2025 रोजी त्यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आरोपींनी आधीच कट रचून चाकू, रेझर, सिमेंट आणि निळा ड्रम आधीच खरेदी करून ठेवला होता. हत्या केल्यानंतर मुस्कान ही शिमला व मनाली येथे फिरायला गेली आणि तिथले फोटो तसेच व्हिडिओ सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत राहिला, जेणेकरून कोणालाही तिच्यावर संशय येऊ नये.

अखेर आईच्या लढ्याला न्याय
18 मार्च रोजी जेव्हा सौरभचा भाऊ राहुल त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा घरातून येणारी संशयास्पद दुर्गंधी आणि विचित्र परिस्थिती पाहून त्याला संशय आला. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली आणि तपासणी केल्यानंतर या भीषण हत्येचा पर्दाफाश झाला. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सौरभच्या आईने दोन्ही आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली होती. अखेर न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला मोठा न्याय मिळाला असून या खटल्यातील फॉरेन्सिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांनी खटला मजबूत केला.

हेही वाचा – नवऱ्याचं धक्कादायक सत्य समोर आलं, तरी संसार वाचवण्याचा प्रयत्न! रात्री आईशी बोलली, पण दुसरा दिवस विवाहितेसाठी ठरला अखेरचा…

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version