मुंबई: भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहारदिनी, बुधवार 18 फेब्रुवारी रोजी सकारात्मक सुरुवात झाली. प्रमुख निर्देशांक बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी 50 हिरव्या चिन्हात उघडले.
30 समभागांचा बीएसई सेन्सेक्स 102.63 अंकांनी म्हणजेच 0.12 टक्क्यांनी वाढून 83,553.59 या पातळीवर उघडला. एनएसई निफ्टी 50 निर्देशांकातही तेजी दिसून आली. निफ्टी 27.25 अंकांनी म्हणजे 0.11 टक्क्यांनी वाढत 25,752.65 वर व्यवहारास सुरुवात झाली. मात्र, बाजार उघडल्यानंतर काही वेळातच चढ-उतार सुरू झाले आणि दोन्ही निर्देशांकांमध्ये घसरण दिसून आली.
सकाळी सुमारे 9 वाजून 22 मिनिटांपर्यंत सेन्सेक्स 14 अंकांनी घसरून 83,436 वर व्यवहार करत होता. तर निफ्टी 50 मध्ये तीन अंकांची घसरण होऊन तो 25,722 या पातळीवर व्यवहार करत होता. सुरुवातीच्या उत्साहानंतर बाजारात सावध हालचाली दिसून आल्या.
हेही वाचा: Newborn Baby Theft: अवघ्या 12 तासांत 'मिशन रेस्क्यू' फत्ते; रुग्णालयातून चोरी झालेले बाळ पोलिसांनी सुखरूप परत मिळवून दिले
बीएसईतील टॉप गेनर समभागांमध्ये टाटा स्टील, आयटीसी, बजाज फिनसर्व, एसबीआयएन आणि ट्रेंट यांचा समावेश होता. तर टॉप लूजरमध्ये अदानी पोर्ट्स, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि मारुती सुझुकी यांचा समावेश होता.
मंगळवार, 17 फेब्रुवारी रोजी बाजारात चांगली तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स 173.81 अंकांनी म्हणजे 0.21 टक्क्यांनी वाढून 83,450.96 वर बंद झाला होता. तर निफ्टी 50 निर्देशांक 42.65 अंकांनी म्हणजे 0.17 टक्क्यांनी वाढून 25,725.40 वर स्थिरावला होता.
त्या दिवशी बीएसईतील आयटीसी, इन्फोसिस, एशियन पेंट्स, अदानी पोर्ट्स आणि टायटन हे टॉप गेनर ठरले होते. तर एटरनल, टाटा स्टील, ट्रेंट, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि महिंद्रा अँड महिंद्रा हे टॉप लूजर होते. निफ्टी 100, निफ्टी बँक, निफ्टी एफएमसीजी, निफ्टी मिडकॅप 100, निफ्टी स्मॉलकॅप 100, निफ्टी ऑटो आणि निफ्टी आयटी निर्देशांकातही वाढ दिसून आली होती. बीएसई बास्केटमधील 28 समभाग हिरव्या चिन्हात बंद झाले होते, तर 12 समभागांमध्ये घसरण नोंदवली गेली होती.
Disclaimer : शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीची आहे. नियम व अटी काळजीपूर्वक वाचा. जय महाराष्ट्र न्यूज कोणत्याही नफ्या-तोट्यास जबाबदार नाही. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या!
हेही वाचा: MSRTC CCTV Cameras : एसटी महामंडळाने कात टाकली! डिजीटल युगाच्या दिशेने एक पाऊल पुढे; बस डेपो ते विभागीय कार्यालये सर्व सीसीटीव्हीच्या निगराणीत