कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना धक्का! सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ

दिल्ली पोलिसांनी केलेल्या मागणीनंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे.
कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्यांना धक्का! सौरव दास आणि आशुतोष रांका यांच्या कोठडीत 2 दिवसांची वाढ
Saurav Das, Ashutosh Ranka

कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) या राजकीय पक्षाचे नेते आशुतोष रांका आणि सौरव दास यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. दिल्ली पोलिसांनी केलेल्या मागणीनंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी (SEM) न्यायालयाने दोन्ही नेत्यांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी 2 दिवसांची वाढ केली आहे. पोलिसांनी यापूर्वी 5 दिवसांची कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती, ज्यावर न्यायालयाने सुनावणी घेत आपला निर्णय दिला. 13 ऑक्टोबर रोजी जंतरमंतर परिसरात परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी आणि निदर्शने केल्याप्रकरणी ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती.

परवानगीशिवाय जंतरमंतरवर आंदोलन केल्याचा पोलिसांचा आरोप

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सौरव दास, आशुतोष रांका, अजिंक्य शिंदे आणि पक्षाचे इतर 11 सदस्य एका खाजगी मालमत्तेच्या मार्गाने जंतरमंतर परिसरात पोहोचले होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्त्यांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी एकूण 14 जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यापैकी अजिंक्य शिंदे यांना शांतता राखण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला, तर दास आणि रांका यांना सुरुवातीला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती, जी आता 2 दिवसांनी वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा – ‘राहुल गांधी पुन्हा सुट्टीवर…’; परदेश दौऱ्यावर गेल्यावरून भाजपचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा, शेअर केलं व्यंगात्मक पोस्टर

जामीन सुनावणीदरम्यान दंडाधिकाऱ्याला धमकी

या प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले असून जामीन सुनावणीदरम्यान विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना (SEM) धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेची गंभीर दखल घेत दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात ‘नॉन-कॉग्निझेबल रिपोर्ट’ (NCR) नोंदवला आहे. दुसरीकडे, कॉकरोच जनता पार्टीच्या कायदेशीर कक्षाच्या प्रमुख रत्ना सिंग यांनी असा आरोप केला आहे की, त्यांच्या नेत्यांच्या जामीन अर्जात हेतुपुरस्सर विलंब केला जात आहे आणि जामीनदारांनी सादर केलेली हमीपत्रे विनाकारण फेटाळली जात आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version