‘कोणीही न्यायालयाला धमकावू शकत नाही…’; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा; मुख्य निवडणूक आयुक्तांनाही नोटीस

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर 11 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही याचिका सादर केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.
‘कोणीही न्यायालयाला धमकावू शकत नाही…’; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाचा कडक इशारा; मुख्य निवडणूक आयुक्तांनाही नोटीस
Supreme Court notice to CEC Gyanesh Kumar

निवडणूक आयोगाच्या (ECI) विविध निर्णयांविरोधात आणि मतदार याद्यांच्या पुनरावलोकन प्रक्रियेविरोधात ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर 11 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ही याचिका सादर केली होती. या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान न्यायालयाने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यासह इतर आयुक्तांना नोटीस जारी केली आहे. मात्र, या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी याचिकाकर्त्यांपैकी एकाच्या म्हणजेच राहुल गांधी यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्या आणि इतर नेत्यांच्या वर्तनावर अत्यंत कडक शब्दांत नापसंती व्यक्त केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग! सुनील तटकरे दिल्लीत मोदींच्या भेटीला, चर्चांना उधाण

न्यायालयाच्या आवारात निदर्शने आणि घोषणाबाजी

सोमवार, 12 ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे नेते जेव्हा याचिका दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले, तेव्हा न्यायालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात समर्थकांची गर्दी जमली होती. या वेळी आवारात जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ निर्माण झाल्याची गंभीर बाब सुनावणीदरम्यान उपस्थित करण्यात आली. ज्येष्ठ वकील गौरव भाटिया यांनी या घटनेचा उल्लेख करत सांगितले की, या प्रकारामुळे कायदेतज्ज्ञांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. न्यायालयावर दबाव आणण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप करत तब्बल 200 वकिलांनी सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनला (SCBA) पत्र लिहून तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

न्यायालयाची प्रतिष्ठा राखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांची मागणी

न्यायालयाच्या आवारात राजकीय निदर्शने, गर्दी जमवणे आणि घोषणाबाजी करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. अशा प्रकारच्या कृतींमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रतिष्ठेला आणि कामकाजाला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला. यावर सरन्यायाधीशांनी ठामपणे बजावले की, “कोणीही सर्वोच्च न्यायालयाला धमकावू शकत नाही किंवा त्याच्यावर दबाव आणू शकत नाही. लोक न्यायालयाच्या बाहेर काहीही बोलत असले, तरी न्यायालयात प्रवेश केल्यावर त्यांची भाषा आणि सूर बदलतात.” न्यायालयाने याप्रकरणी राहुल गांधी यांना नोटीस बजावली असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version