Thursday, July 17, 2025 02:10:42 AM

तो सेल्फी ठरला शेवटचा...! अहमदाबाद विमान अपघातात राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि त्यांची तीन मुले, ज्यात एक मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचा समावेश आहे.

तो सेल्फी ठरला शेवटचा अहमदाबाद विमान अपघातात राजस्थानमधील एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
5 members of a family from Rajasthan die in Ahmedabad plane crash
Edited Image, X

अहमदाबाद: अहमदाबादमध्ये झालेल्या हृदयद्रावक विमान अपघातात शेकडो कुटुंबांना आपले प्राण गमवावे लागले. राजस्थानमधील बांसवाडा येथील एकाच कुटुंबातील पाच जणांचा या विमान अपघातात मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रतीक जोशी, त्यांची पत्नी कोमी व्यास आणि त्यांची तीन मुले, ज्यात एक मुलगी आणि दोन जुळ्या मुलांचा समावेश आहे. 

मृत प्रतीक जोशी व्यवसायाने डॉक्टर होते. ते त्यांच्या कुटुंबासह लंडनमध्ये राहत होते. अपघाताची माहिती मिळताच बांसवाडा जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई केली. जिल्हाधिकारी डॉ. इंद्रजित सिंह यादव, पोलिस अधीक्षक हर्षवर्धन अग्रवाला आणि डीएसपी तात्काळ मृत प्रतीक जोशी यांच्या घरी पोहोचले. तथापि, कुटुंबातील सर्व सदस्य अहमदाबादला रवाना झाल्यामुळे घरी कुटुंबातील कोणीही सदस्य उपस्थित नव्हते. प्रशासनाने कोमी व्यास यांचे वडील अनिल व्यास यांच्या पुतण्याकडून या संदर्भात माहिती गोळा केली. तसेच शोकसंतप्त कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा - '1 हजार DNA चाचण्या केल्या जातील'; अहमदाबाद विमान अपघातानंतर अमित शाहाचे मोठे विधान

प्राप्त माहितीनुसार, डॉ. कोनी व्यास उदयपूरमधील नोकरी सोडून त्यांच्या पतीसोबत लंडनला शिफ्ट होण्यासाठी जात होत्या. याबाबत पॅसिफिक हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने सांगितले की, डॉ. कोनी यांनी महिनाभरापूर्वीच राजीनामा दिला होता. या अपघाताची माहिती मिळताचं डॉ. प्रदीप व्यास यांचे कुटुंब अहमदाबादला रवाना झाले. 

हेही वाचा - अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना टाटा ग्रुपकडून 1 कोटी रुपयांची भरपाई जाहीर

उदयपूरमधील भावा-बहिणीलाचाही विमान अपघातात मृत्यू -  

उदपूर येथील शगुन मोदी आणि शुभ मोदी या भाऊ-बहीणीचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. दोघेही लंडनमध्ये शिक्षण घेत होते. ते काही काळासाठी त्यांच्या मायदेशी परतले होते आणि आता ते शिक्षणासाठी लंडनला जात होते. या भीषण विमान अपघातात राजस्थानच्या 10 जणांचा समावेश असल्याचं सांगितलं जात आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की यामध्ये उदयपूरचे चार आणि बांसवाडा येथील पाच प्रवाशांचा समावेश आहे. लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच एका निवासी भागात कोसळले. या विमानात विमानात क्रू मेंबर्ससह 242 प्रवासी होते. 
 


सम्बन्धित सामग्री