जंतरमंतरवर सध्या नेमकं काय घडतंय? आंदोलनस्थळावरील परिस्थिती जाणून घ्या

Delhi Protest : दिल्लीतील जंतरमंतर परिसरातील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आंदोलनस्थळावरील सध्याची परिस्थिती, पोलिसांचा बंदोबस्त आणि पुढील घडामोडींबाबत उत्सुकता वाढली आहे. नेमकं जंतरमंतरवर काय सुरू आहे आणि या आंदोलनाचं पुढे काय होणार, याबाबत महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत.
जंतरमंतरवर नेमकं काय घडतंय?
Jantar Mantar Protest Update

दिल्लीतील जंतरमंतर या परिसरात आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाची हाक दिलेली आहे. या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबईतह पोलिसांनी सतर्कता वाढवलेली आहे.

दिल्लीतील जंतरमंतर आणि संसद मार्ग परिसरात दिल्ली पोलीस शिवाय सशस्त्र पोलीस दलाचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. हळहूळ गर्दी जमण्यास सुरुवात झालेली असून काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नियमांचे पालन न केल्याचे कारण देत या संपूर्ण आंदोलनाला अधिकृत परवानगी देण्यात आलेली नसल्याची माहिती आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

हेही वाचा-ऐन दिवाळीत विमान प्रवाशांना मोठा धक्का! इंडिगोची उड्डाणे रद्द; पूर्ण वेळापत्रक आले समोर

सुरक्षेच्या कारणास्तव दिल्लीतील तब्बल 57 मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर पडण्याचे दरवाजे बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहे. मध्य दिल्लीत मोबाईल इंटरनेट सेवा तात्पुरती बंद ठेवण्यात आली असून, काही रेल्वेगाड्याही रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version