Tuesday, November 11, 2025 10:18:43 AM

Abuebuo Coffins : शवपेटीच्या रचनेतही नाविन्यता! या देशातील अजब परंपरा; खास पद्धतीनं तयार केल्या जातात कॉफिन्स

लहान मुलांची खेळणी जितकी वेगवेगळ्या रंगसंगती आणि कलात्मकता वापरून तयार केलेली असतात, अशाच प्रकारे या देशातल्या शवपेट्याही तयार केल्या जातात.

abuebuo coffins  शवपेटीच्या रचनेतही नाविन्यता या देशातील अजब परंपरा खास पद्धतीनं तयार केल्या जातात कॉफिन्स

Fantasy Coffins Funeral Tradition : जवळच्या व्यक्तीचा मृत्यू ही प्रत्येकासाठीच दुःखद बाब असते. अशा प्रसंगामध्ये कोणी कलात्मकतेचा वापर करून तिरडी तयार केली आहे किंवा अगदी खास प्रकारची शवपेटी तयार केली आहे, असे कोणी कुठे पाहिले किंवा फारसे ऐकलेले सुद्धा नसेल. पण एक देश असा आहे, जिथे जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मृतदेहाला अत्यंत नावीन्यपूर्ण शवपेटीत ठेवून अंतिम निरोप देण्याची पद्धत आहे.

लहान मुलांची खेळणी जितकी वेगवेगळ्या रंगसंगती आणि कलात्मकता वापरून तयार केलेली असतात, अशाच प्रकारे या देशातल्या शवपेट्याही तयार केल्या जातात. या रंगीबेरंगी, अनोख्या आकारांच्या शवपेट्यांना 'गा' (Ga) लोकांमध्ये 'अबेबुओ' (Abuebuo) म्हणजेच कल्पनारम्य शवपेट्या म्हणून ओळखले जाते.
रंगीत मासा, रंगीबेरंगी मोर, खेकडा, जहाज किंवा अगदी शाळा.. या आकारांमधल्या शवपेट्या घाना (Ghana) या देशातील लोक अंत्यसंस्कारासाठी वापरतात. 

नुसती शवपेटी नाही तर, जीवनगाथा
घानाच्या आकरा (Accra) येथील 'गा' जमातीमध्ये अशी प्रथा आहे की, ते त्यांच्या प्रियजनांना अशा शवपेट्यांमधून अंतिम निरोप देतात, ज्याचा डिझाइन त्यांच्या संपूर्ण जीवन-गाथेला किंवा व्यवसायाला दर्शवते. या शवपेट्या फक्त मृतदेह दफन करण्यासाठी नसतात, तर त्या मृत व्यक्तीच्या आयुष्याचे सार मूर्त रूपात तयार केलेले असते.

उदाहरणार्थ:
- एखाद्या शेतकऱ्याला कारच्या आकाराच्या शवपेटीत दफन केले जात नाही. तर, त्याची शवपेटी तो वापरत असलेल्या औजारांचे किंवा त्याने उगवलेल्या पिकांच्या रूपात तयार केलेली असते.
- मासे विकणाऱ्याला (मच्छी विक्रेता) माशाच्या आकाराच्या शवपेटीतून निरोप देत श्रद्धांजली वाहिली जाते.
- घानाच्या एका माजी शाळा मालकाला शाळेच्या आकाराच्या शवपेटीतून अंतिम निरोप दिला गेला.

हेही वाचा - Weird Divorce Case : या कारणावरूनही होऊ शकतो घटस्फोट?; या जोडप्यासोबत जे झालं ते ऐकून व्हाल थक्क

शवपेटी तयार करण्याची प्रक्रिया
- जेव्हा एखादे कुटुंब आपल्या प्रिय व्यक्तीला गमावते, तेव्हा ते एकत्रित जमून श्रद्धांजली कशी द्यायची हे ठरवतात. त्यानंतर ते सुताराच्या कार्यशाळेत जातात. तिथे ते मृत व्यक्तीच्या आयुष्याबद्दल सुताराला माहिती देतात आणि त्याच्या मार्गदर्शनानुसार मृत व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला साजेल अशी शवपेटी तयार केली जाते.
- शवपेटी कशी असावी, हे पूर्णपणे त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर आणि स्थितीवर अवलंबून असते. 
- सिंहाच्या आकाराचे ताबूत हे केवळ सरदारांसाठी (Chiefs) राखीव असतात; कारण, सिंह हे सामर्थ्याचे प्रतीक मानले जाते.
- आकरा येथील लाबाडी (Labadi) उपनगरातील राजघराणे त्यांच्या घराण्याचे प्रतीक असलेल्या कोंबड्याच्या (Rooster) डिझाइनशी जोडलेल्या शवपेट्या तयार करून घेतात. या केवळ त्यांच्या वंशासाठी राखीव आहेत.

किंमत आणि अंत्यसंस्काराचे स्वरूप
प्रत्येक शवपेटी बनवण्यासाठी साधारणपणे दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्याची किंमत वापरलेल्या लाकडाचा प्रकार आणि त्यावरील डिझाइनची गुंतागुंत यावर अवलंबून असते आणि ती साधारणपणे $700 (सुमारे 58,000 रुपये) पासून सुरू होते.

घानामध्ये अंत्यसंस्कार हे एक उत्सवासारखे उत्साही आयोजन असते. लोक याला मृत व्यक्तीला श्रद्धांजली देण्याची अंतिम संधी मानतात. त्यामुळे, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक वारसा यांचे प्रदर्शन करत आपल्या प्रियजनांना अंतिम निरोप देतात. जिथे कुटुंबीय या कल्पनारम्य शवपेट्यांमधून निरोप देण्यालाच श्रद्धांजली मानतात. तर, या शवपेट्या तयार करणारे त्यांना कलाकृती म्हणून पाहतात.

हेही वाचा - Shocking Report of DNA Test: गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली... आणि जे सत्य समोर आलं, ते पाहून सगळं कुटुंबच हादरलं..!


सम्बन्धित सामग्री