Saturday, November 15, 2025 09:01:14 AM

चीनमधली हॅरी पॉटरची जादुई लायब्ररी पाहिलीत का? व्हिडीओ पाहून समजेल चीनला 'टेक्नॉलॉजी किंग' का म्हणतात..

अमेरिकन व्लॉगर ग्रोसी यांना या ठिकाणाचा शोध पूर्णपणे योगायोगाने लागला. हा व्हिडीओ पाहून चीन खरोखरच भविष्याचा वेध घेणारा देश आहे, असे स्पष्टपणे जाणवते, असे ते म्हणतात.

चीनमधली हॅरी पॉटरची जादुई लायब्ररी पाहिलीत का व्हिडीओ पाहून समजेल चीनला टेक्नॉलॉजी किंग का म्हणतात

China Futuristic Library Video Viral : चीन जगाच्या तुलनेत नेहमीच दोन पाऊले पुढे असतो, याची ग्वाही तेथील तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा देतात. याचेच एक नवीन उदाहरण म्हणजे चीनच्या चेंगदू (Chengdu) शहरातील एका हाय-टेक लायब्ररीचा (पुस्तकांच्या दुकानाचा) व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकन व्लॉगर क्रिश्चियन ग्रोसी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, या ठिकाणाला त्यांनी 'भविष्यातील पुस्तकांचे जग' असे संबोधले आहे. हा व्हिडीओ पाहून चीन खरोखरच भविष्याचा वेध घेणारा देश आहे, असे स्पष्टपणे जाणवते, असे ते म्हणतात.

'हॅरी पॉटर' चित्रपटातील दृश्यासारखी लायब्ररी
व्हिडिओच्या सुरुवातीला ग्रोसी यांनी या लायब्ररीचे वर्णन 'वेलकम टू अ मॉडर्न वंडर ऑफ द वर्ल्ड' (जगातील आधुनिक आश्चर्यांमध्ये स्वागत) असे केले आहे. "या अविश्वसनीय फ्युचरिस्टिक बुकशॉपवर माझा विश्वास बसत नाहीये. मला हे 'हॅरी पॉटर' चित्रपटातील दृश्यासारखे वाटते, जरी मी ते चित्रपट पाहिले नसले तरी," असे ते म्हणाले.
आर्किटेक्चरचे आकर्षण: या लायब्ररीमध्ये सर्पिल (Spiral) पायऱ्या आहेत, ज्या वेगवेगळ्या मजल्यांपर्यंत जातात. बाल्कनीतून पुस्तकांच्या अंतहीन रांगा दिसतात आणि येथे इंग्रजी भाषेतील पुस्तके देखील उपलब्ध आहेत.
सर्वांसाठी योग्य ठिकाण: ग्रोसी यांच्या मते, जर तुम्हाला पुस्तके आवडत असतील, कॅफे आवडत असेल किंवा केवळ उत्कृष्ट आर्किटेक्चरचे वेड असेल, तर चीन हे तुमच्यासाठी योग्य ठिकाण आहे.

हेही वाचा - America Planes Collide: अमेरिकेत विमान अपघात! न्यू यॉर्कच्या लागार्डिया विमानतळावर विमानांची टक्कर,पहा व्हिडिओ

योगायोगाने लागला ठिकाणाचा शोध
या ठिकाणाचा शोध ग्रोसी यांना पूर्णपणे योगायोगाने लागला. त्यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडीओ पांडा अस्वलसाठी प्रसिद्ध असलेल्या चीनमधील चेंगदू शहराचा आहे. चेंगदू हे टियर-2 शहर आहे, म्हणजे ते वेगाने विकसित होत आहे आणि येथील वस्तूंच्या किंमती तुलनेने स्वस्त आहेत.
ग्रोसी सांगतात, "ही लायब्ररी खरं तर एका शॉपिंग मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर आहे. बाहेरून पाहिल्यावर आतमध्ये इतके सुंदर आणि भव्य ठिकाण असेल, याचा कोणी अंदाजही लावू शकत नाही. मी येथे फक्त दुपारचे जेवण करण्यासाठी आलो होतो, पण आतमध्ये प्रवेश करताच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही."

हेही वाचा - Abuebuo Coffins : शवपेटीच्या रचनेतही नाविन्यता! या देशातील अजब परंपरा; खास पद्धतीनं तयार केल्या जातात कॉफिन्स


सम्बन्धित सामग्री