Tuesday, November 11, 2025 11:21:26 AM

Man Swallowed 50 Objects : भयंकर! 29 चमचे, 19 टूथब्रश, 2 पेन; शस्त्रक्रीया करून काढल्या या व्यक्तीच्या पोटातून वस्तू

डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून 29 चमचे,19 टूथब्रश आणि दोन पेन काढले. सचिन असं या तरुणाचं नाव आहे. ही शस्त्रक्रिया चार तास चालली.

man swallowed 50 objects  भयंकर 29 चमचे 19 टूथब्रश 2 पेन शस्त्रक्रीया करून काढल्या या व्यक्तीच्या पोटातून वस्तू

Man Swallowed 50 Objects: उत्तर प्रदेशच्या हापूर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. डॉक्टरांनी एका तरुणाच्या पोटातून 29 चमचे,19 टूथब्रश आणि दोन पेन काढले. सचिन असं या तरुणाचं नाव आहे. ही शस्त्रक्रिया चार तास चालली. बुलंदशहर येथील रहिवासी सचिन हा व्यसनी असल्याचे वृत्त आहे.

सचिनला व्यसनमुक्ती केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. व्यसनमुक्ती केंद्रामध्ये औषधं आढळली नाहीत म्हणून त्याने चमचे आणि इतर साहित्य गिळले. काही वेळाने पोटात या वस्तू अडकल्याने तो आजारी पडला. पोटाचा अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे तपासल्यावर डॉक्टरांना धक्का बसला, कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तू आढळल्या.

हेही वाचाShocking Report of DNA Test: गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली... आणि जे सत्य समोर आलं, ते पाहून सगळं कुटुंबच हादरलं..!

सचिनला हापूरमधील देवनंदिनी रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉ. श्याम कुमार आणि त्यांची टीम शस्त्रक्रियेसाठी सज्ज झाली. जवळजवळ दोन तास चाललेल्या गुंतागुंतीच्या ऑपरेशनमध्ये सचिनच्या पोटातून 29 स्टीलचे चमचे, 19 टूथब्रश आणि 2 टोकदार पेन यासह एकूण 50 हून अधिक वस्तू काढण्यात आल्या.

हेही वाचा - OMG! 'या' कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना दिला iPhone 17 Pro Max; कोण आहे आयफोन देणारा 'जगातील सर्वोत्तम बॉस'

डॉ. श्याम कुमार यांनी सांगितले की, मानसिक आजार किंवा अज्ञात वस्तू गिळण्याची सवय असलेल्या रुग्णांमध्ये असे प्रकार दिसून येतात. वेळेवर उपचार केल्यामुळे सचिनचा जीव वाचला, अन्यथा आतडे फुटणे किंवा अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकला असता. सध्या सचिनची प्रकृती स्थिर आहे. काही दिवसांच्या निरीक्षणानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचे कुटुंब मानसिक उपचारांसह त्याला व्यसनमुक्त होण्यासाठी मदत करण्याची योजना आखत आहे.


सम्बन्धित सामग्री