Tuesday, November 11, 2025 10:04:20 AM

Condom Failure Cases: कंडोम वापरल्यानंतरही गर्भधारणा! ग्राहकांनी कंपनीविरुद्ध दाखल केला खटला

यूकेमध्ये मॅरियन रिचर्डसन या महिलेनं दावा केला की तिच्या जोडीदाराने फाटलेला कंडोम वापरला, ज्यामुळे तिला गर्भधारणा झाली.

condom failure cases कंडोम वापरल्यानंतरही गर्भधारणा ग्राहकांनी कंपनीविरुद्ध दाखल केला खटला

Condom Failure Cases: गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोम वापरले जाते, परंतु अनेक वेळा योग्य वापर असूनही महिलांमध्ये गर्भधारणा झाल्याचे प्रकरणे नोंदली गेली आहेत. यामुळे ग्राहकांनी कंडोम उत्पादक कंपन्यांविरुद्ध खटले दाखल केली आहेत. यूकेमध्ये मॅरियन रिचर्डसन या महिलेनं दावा केला की तिच्या जोडीदाराने फाटलेला कंडोम वापरला, ज्यामुळे तिला गर्भधारणा झाली. तिने एलआरसी प्रोडक्ट्स (जी ड्युरेक्स बनवते) विरुद्ध खटला दाखल करून आई होण्याचा खर्च, गर्भधारणेतील गैरसोय आणि बाळाची काळजी घेण्यासाठी भरपाई मागितली आहे. तथापि, न्यायालयाने दावा फेटाळून लावला. कारण महिलेला कंपनीचे उत्पादन दोषपूर्ण असल्याचे सिद्ध करता आले नाही. 

अमेरिकेतही दाखल करण्यात आला खटला

दरम्यान, दुसऱ्या एका प्रकरणात अमेरिकेत ट्रोजन 'ब्रँड अल्ट्रा थिन' कंडोममध्ये पीएफएएस नावाचे रसायन असल्याचा आरोप करण्यात आला, जे आरोग्यास हानिकारक असू शकते. हा खटला मुख्यतः दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि उत्पादनातील घटकांचा खुलासा न केल्यामुळे दाखल झाला. हा खटला गर्भधारणेवर आधारित नव्हता. या खटल्यातील निकाल अद्याप अस्पष्ट आहे.

कॅनडामध्ये दाखल करण्यात आला खटला

तथापी, आर विरुद्ध हचिन्सन या अलीकडील प्रकरणात एका पुरूषाने त्याच्या जोडीदाराच्या संमतीने कंडोम वापरला. परंतु, नंतर तो फाटला. यामुळे महिलेला गर्भधारणा झाली. या प्रकरणात कंडोम तोडफोड किंवा दोषपूर्ण कंडोमचा जाणूनबुजून वापर समाविष्ट होता. न्यायालयाने हा प्रकार लैंगिक अत्याचार मानला कारण संमतीसह होणाऱ्या कृतीत दोषपूर्ण किंवा तोडफोड केलेले कंडोम वापरणे समाविष्ट होते.

हेही वाचा - Man Swallowed 50 Objects : भयंकर! 29 चमचे, 19 टूथब्रश, 2 पेन; शस्त्रक्रीया करून काढल्या या व्यक्तीच्या पोटातून वस्तू

केनियामधील प्रकरण - 

केनियामध्येही असाच एक प्रकार अलीकडेच समोर आला. एका पुरूषाने बीटा हेल्थकेअरविरुद्ध खटला दाखल केला, ज्यामध्ये त्याने आरोप केला की त्याचे 'झूम' ब्रँडचे कंडोम सेक्स दरम्यान फाटल्यामुळे ते निकृष्ट दर्जाचे होते. तथापि, न्यायालयाने हा खटला फेटाळून लावला कारण तो पुरूष प्रत्यक्षात तो ब्रँड वापरला होता हे सिद्ध करू शकला नाही.

हेही वाचा - Shocking Report of DNA Test: गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली... आणि जे सत्य समोर आलं, ते पाहून सगळं कुटुंबच हादरलं..!

युगांडातील प्रकरण - 

याशिवाय, युगांडामध्ये मेरी स्टॉप्स युगांडा या संस्थेविरुद्ध आरोप आला की बाजारात आणलेल्या दोन बॅचेसला छिद्र होते. त्यामुळे एक व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह झाली आणि दुसऱ्या व्यक्तीला गोनोरियाची लागण झाली. या प्रकरणांमधून स्पष्ट होते की, कंडोम उत्पादक कंपन्यांच्या गुणवत्ता आणि ग्राहक संरक्षणाच्या धोरणांवर जागतिक स्तरावर वाद निर्माण होत आहेत.
 


सम्बन्धित सामग्री