Software Engineer Post : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणाईसाठी आशा निर्माण करणारा आणि तितकाच आश्चर्यचकित करणारा अनुभव एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरने Reddit वर शेअर केला आहे. तब्बल चार महिने बेरोजगारीचा सामना केल्यानंतर त्याला नोकरी मिळाली, पण अवघ्या नऊ दिवसांत त्याने ती सोडून दुसऱ्या कंपनीची ऑफर स्वीकारली. पगारात फार वाढ मिळत नसतानाही त्याने हा निर्णय का घेतला, यामागचे कारण त्याने सांगितले आहे.
बेरोजगारीनंतर मिळाली पहिली ऑफर
या तरुणाने आपल्या पोस्टच्या सुरुवातीला बेरोजगारीच्या काळात आलेल्या अडचणींबद्दल सांगितले. तो म्हणाला, “मित्रांनो, कधीकधी आयुष्य खूप वाईट असते. मी सलग चार महिने बेरोजगार होतो, सर्वत्र अर्ज करत होतो आणि एकापाठोपाठ एक नकार येत होते.” अखेरीस त्याला एका छोट्या स्टार्टअपमध्ये (सुमारे 80 लोक, ज्यात फक्त 10 भारतीय कर्मचारी) नोकरी मिळाली. "नव्या कंपनीत रुजू होऊन फक्त 9 दिवसच झाले होते. मला वाटले की, 'आता परिस्थिती थोडी स्थिर झाली आहे'," असे तो म्हणाला.
दुसरी ऑफर: पगार कमी, पण स्थैर्य अधिक
नव्या कंपनीत रुजू होऊन काही दिवसच झाले असताना, त्याला एका यूके-स्थित बहुराष्ट्रीय कंपनीकडून (MNC) सॉफ्टवेअर इंजिनिअर पदाची ऑफर मिळाली. ही तीच कंपनी होती, ज्यांच्याशी त्याची आधी चर्चा सुरू होती. मात्र, या नव्या कंपनीने त्याला 15 लाख रुपये वार्षिक पगाराची ऑफर दिली, जी त्याच्या सध्याच्या 14 लाख रुपये पगाराच्या तुलनेत फक्त 1 लाख रुपयांनी अधिक होती.
हेही वाचा - Abuebuo Coffins : शवपेटीच्या रचनेतही नाविन्यता! या देशातील अजब परंपरा; खास पद्धतीनं तयार केल्या जातात कॉफिन्स
वर्क-लाईफ बॅलन्सला दिले प्राधान्य
पगारवाढ कमी असूनही, त्याने ही ऑफर स्वीकारण्याचा निर्णय घेतला. याचे कारण स्पष्ट करताना त्याने सांगितले की, ही नवी कंपनी मोठी, स्थिर आणि चांगले उत्पादन असलेली आहे. तसेच, नोकरीचे ठिकाण बंगळूरू असून, ऑफिसला फक्त दोन दिवसच जावे लागते. यामुळे त्याचे वर्क-लाईफ बॅलन्स साधणे सोपे होणार होते.
I have resigned within 9 days after joining a remote Devops role - 14 lpa
byu/Cosmicsgod indevelopersIndia
वरिष्ठांचाही होता 'हाच' सल्ला
दुसरी ऑफर स्वीकारण्यापूर्वी त्याने Nvidia, Amazon, Zeta आणि Nutanix सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या मित्र आणि वरिष्ठांशी चर्चा केली. त्या सर्वांनी या तरुणाला ही ऑफर स्वीकारण्याचा सल्ला दिला. तरुण म्हणाला, “अक्षरशः प्रत्येकाने मला सांगितले की, ही ऑफर स्वीकार. पगारातील फरक कदाचित मोठा नसेल, परंतु करिअरचा मार्ग आणि जीवनाचा दर्जा चांगला असेल.” अखेर, अवघ्या नऊ दिवसांत राजीनामा देण्याचा निर्णय त्याने घेतला आणि पुढील किमान दोन वर्षे दुसरी नोकरी शोधायची नाही, हे ठरवून नवीन नोकरी स्वीकारली.
हेही वाचा - Weird Divorce Case : या कारणावरूनही होऊ शकतो घटस्फोट?; या जोडप्यासोबत जे झालं ते ऐकून व्हाल थक्क