Vijay Mallya: मी घोटाळेबाज कसा? कर्ज फेडले.. तपासयंत्रणांनी बँकांपेक्षा जास्त वसुली.. विजय माल्याने ‘हा’ नवा दावा करत मागितला परतावा

मुंबई उच्च न्यायालयात प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ माल्याने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे.

Vijay Mallya: मी घोटाळेबाज कसा? कर्ज फेडले.. तपासयंत्रणांनी बँकांपेक्षा जास्त वसुली.. विजय माल्याने ‘हा’ नवा दावा करत मागितला परतावा

Vijay Mallya Refund Demand: एकेकाळचा मद्यसम्राट विजय माल्या पुन्हा एकदा सोशल मीडियावरील आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत आला आहे. एक्स (X) या प्लॅटफॉर्मवर विविध पोस्ट करत त्याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला असून भारतीय तपास यंत्रणांच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आपल्यावरील कर्जाच्या तुलनेत तपास यंत्रणांनी दुप्पट रक्कम वसूल केली असून, उरलेली अतिरिक्त रक्कम मला कधी परत मिळणार असा सवाल माल्याने विचारला आहे. 

ईडीच्या प्रतिज्ञापत्राचा हवाला देत अतिरिक्त वसूलीचा आरोप
मुंबई उच्च न्यायालयात प्रवर्तन निर्देशालयाने (ईडी) सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राचा संदर्भ माल्याने आपल्या पोस्टमध्ये दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार आपल्यावर 6203 कोटी रुपयांचे कर्ज निश्चित करण्यात आले होते, परंतु ईडीने 2021 पर्यंत तब्बल 14131.60 कोटी रुपयांची वसुली केल्याचे स्वतः मान्य केले आहे, असा दावा त्याने केला. कर्जाची संपूर्ण रक्कम चुकवल्यानंतरही प्रसारमाध्यमांमध्ये पाच वर्षांनंतरही आपल्याला घोटाळेबाज का म्हटले जात आहे, असा सवाल त्याने उपस्थित केला. 

किंगफिशर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि परताव्याची मागणी 
आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ माल्याने काही प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत:
– ईडीने जप्त केलेल्या आपल्या मालमत्तेतूनच किंगफिशर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन देण्यास 350 कोटी रुपये मंजूर केले होते.
– संपत्ती आणि खाती जप्त झाल्यामुळेच आपण कर्मचाऱ्यांना थेट पैसे देऊ शकलो नव्हतो.
– बँकांनी मूळ कर्जापेक्षा जास्त रक्कम वसूल केली असल्याने आपल्याला उर्वरित अतिरिक्त रकमेचा रिफंड मिळाला पाहिजे.

हेही वाचा – Rahul Gandhi : राहुल गांधींना मोठा झटका! पंतप्रधान मोदींविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यप्रकरणी मानहानीचा खटला रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

ब्रिटेन सोडण्यावरील कायदेशीर बंदीचे कारण
भारतात येणे टाळत असल्याच्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना माल्याने परदेशात राहण्यामागची कारणे मांडली आहेत. आपण 1992 पासून युनायटेड किंगडमचे (UK) कायदेशीर रहिवासी असून सध्या तेथील कायदेशीर प्रक्रियेमुळे यूके सोडण्यावर बंदी असल्याचे त्याने सांगितले. भारत सरकारच्या कारवायांमुळे आपण अडचणीत सापडलो असून, स्वखुशीने न राहता कायदेशीर बंधनांमुळे यूकेत अडकल्याचे माल्याचे म्हणणे आहे.

न्यायालयाची कडक भूमिका आणि दिलासा देण्यास नकार
दुसऱ्या बाजूला भारतीय न्यायालये आणि सरकार माल्याच्या भूमिकेबाबत अत्यंत कठोर आहेत. यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने माल्याला फटकारताना स्पष्ट केले होते की, जो व्यक्ती जाणूनबुजून न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रापासून दूर राहतो त्याला कोणताही कायदेशीर दिलासा दिला जाऊ शकत नाही. स्वतःला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित करण्याच्या निर्णयाविरोधात माल्याने याचिका दाखल केली असता, न्यायालयाने त्याला भारतात परतण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्याची अंतिम संधी दिली होती.

हेही वाचा – Subhash Chandra: सुभाष चंद्र यांच्या विरोधात थेट CBIची कारवाई! FIR दाखल होताच प्रकरणाला वेगळं वळण; मोठ्या घोटाळ्याच्या आरोपांनी खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number