राष्ट्रीय महामार्गावर आगीचे रौद्र रूप! धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकने अचानक पेट घेतला; वाहतूक विस्कळीत

अकोल्यातील बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. यावेळी चालक-वाहक प्रसंगावधान राखून बचावले.

राष्ट्रीय महामार्गावर आगीचे रौद्र रूप! धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकने अचानक पेट घेतला; वाहतूक विस्कळीत
Akola Truck Fire

अकोल्यातील बोरगाव मंजू राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग लागल्याची घटना घडली. यावेळी चालक-वाहक प्रसंगावधान राखून बचावले. अकोला जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर बोरगाव मंजूजवळ अकोल्याकडून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या धावत्या खाद्यतेल वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रकला आग लागली.

काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले असून ट्रक व त्यातील साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, चालकाच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने प्रसंगावधान राखून चालक व वाहक या दोघेही ट्रकमधून सुरक्षित बाहेर काढले.

हेही वाचा- धक्कादायक! प्रेयसीचा विवाह ठरला, संतापलेल्या प्रियकराने तिला खोल दरीत ढकलून दिलं; कोल्हापूर हादरलं

10 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे नागपूर अकोला महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, खाद्यतेलाची वाहतूक करणारा मालवाहू ट्रक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरून अकोल्याकडून अमरावतीच्या दिशेने जात असताना अचानक ट्रकने पेट घेतला. पाहता पाहता आगीने भीषण स्वरूप धारण केले.

ट्रकमधील खाद्यतेलामुळे आग विझविण्याचे काम आव्हानात्मक ठरले. या घटनेमुळे महामार्गावर एकच खळबळ उडाली. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून मालवाहू ट्रकला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेत झालेल्या नुकसानीचा तपशीलही समोर आलेला नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number