पिंपरी-चिंचवडमध्ये भल्या पहाटे आगीचा भडका; 6 ते 7 दुकानांना भीषण आगीचा विळखा, परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आज पहाटे जवळपास सहा सात दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये भल्या पहाटे आगीचा भडका; 6 ते 7 दुकानांना भीषण आगीचा विळखा, परिसरात खळबळ
Pimpri Chinchwad Fire

पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरात आज पहाटे जवळपास सहा सात दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील प्रीष्टीन ब्रो लाईफ येथील जवळपास सहा ते सात दुकानांना आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा- चहात साखर कमी म्हणून ग्राहक संतापला! चहावाल्याला बेदम मारहाण; पोलिसांकडून अद्याप कारवाई नाही

या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत दुकानांमधील साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे.

सुदैवाने, या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अग्निशमन दलाने वेळीच धाव घेतल्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले असून, या घटनेमुळे परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number