अमरावती : अमरावती जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलेली आहे. तिवसा शहरात अप्पर वर्धा धरणाच्या मुख्य कालव्यात एक शेतकरी वाहून गेला असून त्याचा शोध अजूनही लागलेला नाही. पिंटू उर्फ दिवाकर माहोरे (वय 52) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पाण्याच्या जोरदार प्रवाहात शेतकरी बेपत्ता
मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी हंगामासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आलेले होते. काल दुपारच्या सुमारास ते कालव्यात हातपाथ धुण्यासाठी उतरले. त्याचवेळी त्यांचा पाय घसरला आणि ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेले. घटना घडताच स्थानिकांनी आरडाओरड केली, मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने त्यांना वाचवता आले नाही.
याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कालपासून शोध आणि बचाव मोहीम ही युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनपर्यंत ही माहोरे यांचा मृतदेह हाती लागलेला नाही. या कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने बचाव कार्यात अडथळे येत आहेत. सध्या प्रशासनाकडून कालव्याच्या काठावर शोध मोहीम राबवली जात आहे. रब्बीसाठी सोडलेल्या पाण्यामुळे एका शेतकऱ्याचाच जीव धोक्यात आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update