Sunday, February 15, 2026 08:07:11 AM

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो लक्ष द्या ! उद्या लोकलचा मोठा 'मेगा ब्लॉक'; घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वेळापत्रक नक्की वाचा

मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

mumbai local mega block  मुंबईकरांनो लक्ष द्या  उद्या लोकलचा मोठा मेगा ब्लॉक घराबाहेर पडण्यापूर्वी हे वेळापत्रक नक्की वाचा

Mumbai Local Mega Block :  जर तुम्ही रविवारी (25 जानेवारी) सुट्टीनिमित्त बाहेर जाण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

1. मध्य रेल्वे (Main Line): माटुंगा ते मुलुंड वेळ: सकाळी 11:05 ते दुपारी 3:45 पर्यंत

डाउन जलद मार्ग: सकाळी 10:36 ते दुपारी 3:10 दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या जलद लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिराने धावतील.

अप जलद मार्ग: ठाण्याहून सकाळी 11:03 ते दुपारी 3:38 दरम्यान सुटणाऱ्या अप जलद लोकल मुलुंड ते माटुंगा दरम्यान धीम्या मार्गावर चालवल्या जातील. या गाड्या देखील 15 मिनिटे विलंबाने पोहोचतील.

2. हार्बर रेल्वे: सीएसएमटी ते चुनाभट्टी/वांद्रे वेळ: सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:40 पर्यंत (विविध टप्प्यात)

हार्बर मार्गावर प्रवाशांचे सर्वाधिक हाल होण्याची शक्यता आहे, कारण अनेक फेऱ्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत:

रद्द फेऱ्या (डाउन): सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या सर्व लोकल दुपारी 4:47 पर्यंत बंद राहतील.

रद्द फेऱ्या (अप): पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सीएसएमटीकडे येणाऱ्या गाड्या (सकाळी 9:53 ते दुपारी 3:20) आणि गोरेगाव/वांद्रे येथून येणाऱ्या गाड्या (सकाळी 10:45 ते सायंकाळी 5:13) रद्द असतील.

हेही वाचा - AC Local on Harbour Line : नवी मुंबईकरांचा प्रवास आता गारेगार! 26 जानेवारीच्या मुहुर्तावर धावणार AC लोकल, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना 

शक्य असल्यास हार्बर मार्गावरील प्रवाशांनी पश्चिम रेल्वे किंवा ट्रान्स-हार्बर मार्गाचा पर्यायी वापर करावा. लोकल 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवासासाठी हातात जास्तीचा वेळ ठेवावा. तसेच प्रवाशांनी प्रवासावेळी रेल्वे स्थानकांवरील उद्घोषणांकडे लक्ष द्यावे. 


सम्बन्धित सामग्री