देवमाणूस चित्रपटाचा टीझर लाँच

भारत - लव फिल्म्स निर्मित 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे.
देवमाणूस चित्रपटाचा टीझर लाँच

मुंबई : भारत – लव फिल्म्स निर्मित 'देवमाणूस' चित्रपटाचा टिझर नुकताच रिलीझ झाला आहे. या बहुप्रतिक्षित मल्टीस्टारर चित्रपटात मराठी सिनेसृष्टीतील दमदार कलाकार महेश मांजरेकर, रेणुका शहाणे आणि सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबतच लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ बोडके हे सुद्धा आहेत. या नव्या आणि लव फिल्म्सच्या पहिल्याच मराठी चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे आणि आता 'देवमाणूस'चा टीझर पाहता प्रेक्षक वर्गाला एक आकर्षक सिनेमॅटिक अनुभव मिळणार आहे.

देवमाणूसच्या टीझरमध्ये आपण अभिनेता महेश मांजरेकर ह्यांना कधीही न पाहिलेल्या वारकरीच्या भूमिकेत पाहू शकतो. तसेच रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांचीही भूमिका अतिशय आकर्षक आणि जबरदस्त दिसत आहे. लक्ष वेधून घेणारे दृश्य आणि वेगवान साउंडट्रॅकसह, 'देवमाणूस' चित्रपटाची भव्यता समजून येते.

हेही वाचा : चंद्रपूर जिल्हा बँकेवर सायबर हल्ला, 3.70 कोटी रुपयांचा अपहार
 

विशेष म्हणजे, देवमाणूसचा टीझर संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये विकी कौशलच्या छावा चित्रपटासह प्रदर्शित केला जाणार आहे. जे या मराठमोळ्या चित्रपटाला अपेक्षित असलेल्या उच्च प्रेक्षकवर्गापर्यंत पोहोचवेल आणि त्याचा लाभ मिळेल. टीझर रिलीझच्या उत्साहात, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर म्हणतात, देवमाणूस हा माझ्यासाठी अतिशय रोमांचक प्रोजेक्ट आहे कारण त्याची विलक्षण बांधणी आणि त्यातील पात्रांची सखोलता या प्रतिभावान कलाकारांनी जिवंत केली आहे. हा चित्रपट बनवण्याचा संपूर्ण प्रवास खूपच मनोरंजक आहे आणि या टीझरद्वारे प्रेक्षकांपर्यंत या सिनेमाची एक झलक शेअर करताना मला खूपच आनंद होत आहे. देवमाणूस २५ एप्रिल २०२५ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होईल आणि म्हणूनच मी प्रेक्षकांनी हा सिनेमा अनुभवण्याची आतुरतेने वाट पाहतो आहे.

लव फिल्म्स प्रस्तुत, 'देवमाणूस' या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून लव रंजन आणि अंकुर गर्ग निर्मित आहे. हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version