Donald Trump: ‘त्या’ एका गुप्त करारासाठी ट्रम्प पाकिस्तानला जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगभरात खळबळ

अमेरिका-इराण चर्चा निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे सांगितले जात असले, तरी तेहरानने अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Donald Trump: ‘त्या’ एका गुप्त करारासाठी ट्रम्प पाकिस्तानला जाणार? डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका विधानाने जगभरात खळबळ

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा करत म्हटले आहे की, इराणने समृद्ध युरेनियमचा साठा सोपवण्यास तत्त्वतः सहमती दर्शवली आहे. ट्रम्प यांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चा निर्णायक टप्प्यात पोहोचली असून सहा आठवड्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी दोन्ही देश कराराच्या जवळ आले आहेत.

व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, “ते आम्हाला न्यूक्लिअर डस्ट परत देण्यास तयार झाले आहेत.” ट्रम्प यांनी “न्यूक्लिअर डस्ट” हा शब्द समृद्ध युरेनियमसाठी वापरला. अमेरिकेचा आरोप आहे की, या युरेनियमचा वापर अण्वस्त्रे तयार करण्यासाठी केला जाऊ शकतो. मात्र, इराणने ट्रम्प यांचा दावा फेटाळत अद्याप कोणताही अंतिम करार झालेला नसल्याचे स्पष्ट केले आहे.

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेची पुढील फेरी याच आठवड्याच्या अखेरीस होऊ शकते. त्यांनी युद्धविराम वाढवण्याची गरज नसल्याचेही म्हटले. “मला वाटत नाही की युद्धविराम वाढवण्याची गरज आहे,” असे सांगत ट्रम्प यांनी तेहरान आता अधिक लवचिक भूमिका घेत असल्याचे नमूद केले.

इराणच्या अणुकार्यक्रमावरूनच या चर्चेत सर्वात मोठा वाद आहे. अमेरिकेने इराणने अणुसंबंधित सर्व हालचाली 20 वर्षांसाठी थांबवाव्यात, अशी मागणी केली होती. मात्र ट्रम्प यांनी नंतर स्पष्ट केले की, इराणने केवळ 20 वर्षांसाठी नव्हे तर त्यापुढेही अण्वस्त्रे विकसित न करण्याचे आश्वासन दिले आहे. इराणने मात्र तीन ते पाच वर्षांच्या मर्यादित स्थगितीचा प्रस्ताव दिला होता.

हेही वाचा: MI Vs PBKS IPL 2026: मुंबई इंडियन्सला सलग चौथा 'शॉक'! डी कॉकचं शतक गेलं वाया; पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सला घरच्या मैदानात चारली धूळ

वॉशिंग्टनने इराणने सर्व समृद्ध युरेनियम देशाबाहेर काढावे, यावर भर दिला आहे. मात्र इराण केवळ काही प्रमाणात युरेनियम बाहेर पाठवण्याचा विचार करत असल्याचे वृत्त आहे. याआधी तेहरानने अशा कोणत्याही प्रस्तावाला नकार दिला होता.

ट्रम्प यांनी असेही सांगितले की, जर इस्लामाबादमध्ये करार झाला तर ते स्वतः पाकिस्तानला जाऊ शकतात. त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि जनरल आसिम मुनीर यांच्या मध्यस्थीच्या भूमिकेचे कौतुक केले. पाकिस्तानमध्ये झालेल्या चर्चेत उपाध्यक्ष जेडी वॅन्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर सहभागी झाले होते.

दरम्यान, ट्रम्प यांनी पोप लिओ यांच्यावरही टीका केली. इराणकडून निर्माण होणारा धोका समजून घेणे पोपसाठी महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. “इराणकडे अण्वस्त्र असू शकत नाही. नाहीतर जग मोठ्या संकटात सापडेल,” असे ट्रम्प यांनी म्हटले. पोप लिओ यांनी मात्र सातत्याने युद्धाऐवजी शांतता आणि संयमाचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: Women Reservation Act : ऐतिहासिक पाऊल! महिला आरक्षणावरून रात्री उशीरापर्यंत संसदेत चर्चा सुरू; अखेर नारी शक्ती वंदन अधिनियम अधिसूचित

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number