FDA च्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबन; मंत्री झिरवळांनी दिली माहिती, नेमके प्रकरण काय?

नाशिक, मालेगावातील सुपारी घोटाळा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

FDA च्या 5 अधिकाऱ्यांचं निलंबन; मंत्री झिरवळांनी दिली माहिती, नेमके प्रकरण काय?

नाशिक, मालेगावातील सुपारी घोटाळा प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पाच अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंत्री नरहरी झिरवळ आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने ही कारवाई करण्यात आली.

नेमके प्रकरण काय?
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे 11 फेब्रुवारी 2024 रोजी FDA च्या गुप्तवार्ता विभागाने अवैध वाहतूक होत असल्याच्या प्रकरणात सुपारीने भरलेले 11 ट्रक पकडले होते. या ट्रकांमधील सुपारीचा साठा जप्त करण्यात आला. एकूण 3,605 पोत्यांमध्ये असलेल्या या मालाचे बाजारमूल्य अंदाजे 10 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

एफडीएच्या अहवालात ही सुपारी खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर न्यायालयाने 5  मार्च 2025 रोजी ती नष्ट करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर संबंधित पाच अधिकाऱ्यांनी नाशिक विभागाचे सहाय्यक आयुक्त व्ही. पी. पाटील यांना तोंडी माहिती देऊन सुपारीचा साठा नष्ट केल्याचे नमूद केले होते.

हेही वाचा – रबडीच्या दुकानात धक्कादायक प्रकार! सीताफळ पल्पमध्ये आढळल्या अळ्या, FDA ची धडक कारवाई

परंतु, पाच अधिकाऱ्यांच्या जबाबात विसंगती आल्यामुळे जप्त सुपारी नष्ट केली की विकली, यावर संशय गडद झाला आहे. वरिष्ठांना विल्हेवाट लावल्याचे सांगून माल विकल्याचा आरोप आहे, मात्र अंतिम निष्कर्ष अद्याप नाही.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री नरहरी झिरवळ आणि FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाचही अधिकाऱ्यांचे निलंबन केले. मंत्री झिरवळ यांनीही या कारवाईबाबत माहिती दिली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number