माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून हत्या; शेतातील निवासस्थानासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

बोथली गावातील शेतशिवारात माजी प्राध्यापक चंद्रशेखर दहीकर यांची विटांनी मारहाण करून हत्या करण्यात आली.

माजी प्राध्यापकाची विटांनी ठेचून हत्या; शेतातील निवासस्थानासमोर रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह
Crime News

आमगाव : आमगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या बोथली गावातील शेतशिवारात माजी प्राध्यापकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रशेखर दहीकर असे मृत माजी प्राध्यापकाचे नाव आहे. अज्ञात व्यक्तींनी रात्रीच्या सुमारास विटांनी मारहाण करून त्यांची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.

शेतातील निवासस्थानासमोर आढळला मृतदेह

चंद्रशेखर दहीकर हे ठाणाटोला-जवरी मार्गावरील बोथली गावाच्या शेतशिवारात राहत होते. ते शेतात एकटेच वास्तव्यास होते. याच ठिकाणी ते कुक्कुटपालनाचा व्यवसायही करत होते. रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर विटांनी बेदम मारहाण केली. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

शेतकऱ्याला दिसला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह

सकाळी शेजारील शेतात जाणाऱ्या एका शेतकऱ्याला चंद्रशेखर दहीकर यांचा मृतदेह त्यांच्या निवासस्थानासमोरील वनविभागाच्या जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. ही घटना पाहून शेतकऱ्याने तातडीने बोथली ग्रामपंचायतीच्या सरपंचांना माहिती दिली. सरपंचांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती कळवली.

लग्नाला तीन महिनेच झाले अन् काळाचा घाला! पाळधी रेल्वे पुलावर आयशरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

आमगाव पोलिसांकडून तपास सुरू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आहे. माजी प्राध्यापकाची हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, तसेच या हत्येमागे कोणाचा हात आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. अज्ञात आरोपींचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

या घटनेमुळे बोथली गावासह परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्येचे कारण आणि आरोपींबाबतची अधिक माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number