Apple AirPods Pro 4 : आपल्या युजर्ससाठी Apple एक असा चमत्कार घडवणार आहे, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. आगामी AirPods Pro 4 मध्ये चक्क 'कॅमेरे' बसवले जाणार आहेत. प्रसिद्ध अॅपल विश्लेषक मिंग-ची कुओ आणि लीकर कोसुतामी यांच्या माहितीनुसार, अॅपल आपले ऑडिओ डिव्हाइस एका हाय-टेक सेन्सरमध्ये बदलण्याच्या तयारीत आहे.
कॅमेऱ्याचा कसा होईल उपयोग?
अॅपल एअरपॉड्समध्ये बसवण्यात येणारे हे कॅमेरे सामान्य फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी नसतील. हे विशेष इन्फ्रारेड (IR - Infrared) कॅमेरे असतील. हे कॅमेरे युजरच्या आजूबाजूचे वातावरण 'पाहू' शकतील आणि त्यानुसार आवाजात बदल करतील. यामुळे 'स्पेशिअल ऑडिओ'चा (Spatial Audio) अनुभव अधिक नैसर्गिक आणि खास होणार आहे.
हवेत हात हलवून करा सर्वकाही नियंत्रित
या कॅमेऱ्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 'जेस्चर कंट्रोल' (Gesture Control). यामध्ये तुम्हाला फोनला किंवा एअरपॉड्सला स्पर्श करण्याची गरज उरणार नाही.
गाणी बदलणे: हवेत हात विशिष्ट पद्धतीने हलवून तुम्ही गाणी बदलू शकाल.
व्हॉल्यूम कंट्रोल: हात वर-खाली करून आवाजाची तीव्रता कमी-जास्त करता येईल.
सिरी (Siri): केवळ डोके हलवून तुम्ही कॉल स्वीकारू किंवा नाकारू शकाल.
हेही वाचा - Google Personal History: इंटरनेटवर तुमचे खासगी फोटो किंवा नंबर दिसतोय? नो टेन्शन ; गुगलने आणलंय 'हे' भन्नाट टूल, जाणून घ्या नवी ट्रिक
Vision Pro सोबत जबरदस्त ताळमेळ
हे तंत्रज्ञान अॅपलच्या Vision Pro हेडसेटचा अनुभव सुधारण्यासाठी आणले जात आहे. तुम्ही व्हिजन प्रो वापरत असताना जर तुमच्या डोक्याची दिशा बदलली, तर हे इन्फ्रारेड कॅमेरे ती हालचाल टिपून आवाजाची दिशा त्वरित बदलतील. यामुळे तुम्हाला खरोखर त्या वातावरणात असल्याचा भास होईल.
किंमत आणि उपलब्धता
काही रिपोर्ट्सनुसार, या प्रीमियम फिचर्सनंतरही अॅपल AirPods Pro 4 ची किंमत जुन्या मॉडेलप्रमाणेच 249 डॉलर्स (सुमारे 21,000 रुपये ते 25,900 रुपये) ठेवू शकते. मात्र, हे मॉडेल AirPods Pro 3 चे एक 'हाय-एंड' व्हर्जन म्हणून देखील लाँच केले जाऊ शकते.
कधी होणार लाँच?
अॅपल साधारणपणे दर 3 वर्षांनी आपले 'प्रो' मॉडेल्स अपडेट करते. एअरपॉड्स प्रो 3 हे 2025 मध्ये लाँच झाले असल्याने, हे कॅमेरावाले नवीन एअरपॉड्स 2026 मध्ये अॅपलच्या इव्हेंटमध्ये सादर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा - AI Regulation : AI जनरेटेड कंटेंटवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; आता करावं लागणार 'या' नियमांच पालन, अन्यथा...