मतमोजणीला सुरुवात,8 वाजता होणार 14 टेबल्सवर मतमोजणी, अवैध मते वगळून विजयाचा कोटा ठरणार.महायुतीचे किरण सरनाईक विरुद्ध काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यात अटीतटीची थेट लढत. प्राधान्यक्रमाच्या मतमोजणीमुळे निकालाला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता.
मतमोजणीला सुरुवात,8 वाजता होणार 14 टेबल्सवर मतमोजणी, अवैध मते वगळून विजयाचा कोटा ठरणार.महायुतीचे किरण सरनाईक विरुद्ध काँग्रेसच्या प्रा. आदिती पोहरे यांच्यात अटीतटीची थेट लढत. प्राधान्यक्रमाच्या मतमोजणीमुळे निकालाला 24 तासापेक्षा जास्त वेळ लागण्याची शक्यता.
काल दिवसभराच्या खोळंब्यानंतर आज पहाटेपासून मध्य रेल्वे सुरळीत असून कालच्या गोंधळात तीन जणांनी जीव गमावल्याची घटना तर अनेक जण जखमी आहेत. या मृत्यूला मध्य रेल्वेच जबाबदार असलेल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांकडून होत आहे.
नवीन ऊर्जा प्रकल्पांच्या जमिनीच्या अंतर्गत हस्तांतरणावरील २५ टक्के शुल्क माफ.महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर निर्णय.मुख्य कंपनीकडून प्रकल्पाच्या उपकंपनीकडे जमीन हस्तांतरित करताना शुल्कमाफी.सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांच्या खर्चात होणार बचत.कंपन्यांवरील अतिरिक्त आर्थिक भार कमी होणार.बँक कर्ज आणि परदेशी गुंतवणूक मिळवण्याचा मार्ग होणार सुकर.१८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या मंत्रिमंडळ निर्णयानुसार शुल्कमाफी
महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निकालानंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील पदवीधर मतदारसंघांच्या निवडणूक निकालांबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. विविध पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य मतमोजणीतून स्पष्ट होणार आहे. मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून, निकालानंतर राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेला सकाळी बसलेल्या तांत्रिक बिघाडाचा फटका तब्बल दहा तासांनंतरही कायम आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरून रवाना होणाऱ्या लोकल गाड्या अद्याप 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. सकाळच्या सुमारास लोकल गाड्यांना दीड ते दोन तासांचा विलंब होत असताना, आता हा विलंब कमी होऊन 15 ते 20 मिनिटांवर आला आहे. मात्र, रेल्वे वाहतूक अद्याप पूर्णपणे सुरळीत झालेली नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे पूर्वपदावर कधी येणार, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी डोंबिवलीकरांनी मोठे योगदान दिले असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हा धनादेश रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सामाजिक उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे आभार मानले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र पर्यायी वनीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरणाच्या (महा कॅम्पा) नियामक मंडळाची बैठक पार पडली. यावेळी पर्यायी वनीकरणांतर्गत आतापर्यंत १ लाख ७ हजार ८६५ हेक्टर क्षेत्रावर रोपवन, तर १५ हजार ७२४ हेक्टर क्षेत्रावर कुरण विकासाची कामे पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. तसेच व्याघ्र प्रकल्प आणि संरक्षित क्षेत्रांमधील ५५ गावांचे पुनर्वसन करण्यात आले असून, ६२ महिला विश्रामगृहांसह निवासस्थाने आणि कार्यालयांच्या बांधकामाचाही आढावा घेण्यात आला.
मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील मिसिंग लिंकवर सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नवीन कायमस्वरूपी वाहतूक अधिसूचना जारी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे अपर पोलीस महासंचालक (वाहतूक) प्रवीण साळुंके यांनी जारी केलेल्या या अधिसूचनेनुसार १ नोव्हेंबर २०२६ पासून सर्व प्रकारच्या मालवाहू वाहनांना मिसिंग लिंकवर प्रवेश बंद करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याचा परिणाम आता हार्बर मार्गावरील लोकल सेवेवरही दिसून येत आहे. हार्बर मार्गावरील लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यातच वांद्रे आणि वाशीच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल गाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सध्या गोरेगाव, पनवेल आणि बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे विविध रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढण्याची शक्यता असून, कामावरून घरी परतणाऱ्या प्रवाशांचे वेळापत्रकही कोलमडले आहे. मध्य रेल्वेची वाहतूक पूर्णपणे कधी सुरळीत होणार, याकडे आता प्रवाशांचे लक्ष लागले आहे.
मध्य रेल्वेची लोकल सेवा विस्कळीत असतानाच भांडुप रेल्वे स्थानकावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. भांडुप स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ४ वर उतरून प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरून लोकल पकडण्यासाठी जात असताना एका युवकाचा एसी ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य मार्गावरील प्रवाशांना मेन लाईनच्या तिकीट आणि पासवरून हार्बर तसेच ट्रान्सहार्बर मार्गावर प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी रेल्वे मार्गाचा वापर करून इच्छित स्थळी पोहोचणे शक्य होणार आहे.
मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला आग लागल्याने लोकल सेवा विस्कळीत आहे. दरम्यान, लोकल सेवा हळूहळू पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली असून मध्य रेल्वेची सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी आणखी किती वेळ लागणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी माहिती दिली आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर शिंदखेडा नगरीत १४४ वर्षांची मोठी परंपरा लाभलेला श्री बालाजी महाराजांचा भव्य रथोत्सव आज मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात सुरुवात करण्यात आली. गेल्या १४३ वर्षांची अखंड परंपरा जपत आज १४४ व्या वर्षात पदार्पण करणारा हा रथोत्सव संपूर्ण परिसरासाठी श्रद्धा आणि अस्मितेचा केंद्रबिंदू ठरला आहे. रथाच्या आगमनाने आणि रथाच्या ओढण्याने संपूर्ण शिंदखेडा नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली. या काळात हजारो भाविकांनी एकाच सुरात “राधे रमणा गोविंदा, व्यंकट रमणा गोविंदा” असा जयघोष करत आणि फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत रथ ओढला.
सातारा-पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लिंब गावाजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून, प्रशासकीय यंत्रणेचा गंभीर निष्काळजीपणा समोर आला आहे.
‘लाच देणार नाही, लाच घेणार नाही आणि प्रत्येक काम प्रामाणिकपणे करेन!’ असा निर्धार रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला आहे. दक्षता जनजागृती सप्ताहाच्या शुभारंभानिमित्त भ्रष्टाचार निर्मूलनाची सामूहिक शपथ घेण्यात आली. १ नोव्हेंबरपर्यंत जिल्हाभर हा सप्ताह साजरा केला जाणार असून, प्रशासनातील पारदर्शकता, सचोटी आणि जनहिताला प्राधान्य देण्याचे आवाहन करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी उपस्थितांना शपथ दिली. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. बँकेतून पेन्शनचे अवघे चार हजार रुपये काढून घरी परतणाऱ्या वृद्ध आजीला लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. हातातील पैशांची बॅग हिसकावण्यासाठी एका अल्पवयीन मुलाने आजींना जोरात धक्का देत खाली पाडलं. मात्र, आजींनी बॅग घट्ट पकडल्याने त्याचा डाव फसला. या संपूर्ण घटनेचा थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.
कोकणातील कलाकुसर आता थेट दुबईत दिवाळीचा प्रकाश पसरवणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरूख येथील शेखर सावंत यांच्या ‘गंध क्रिएशन’चे पर्यावरणपूरक, फोल्डेबल आणि भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे आकाश कंदील यंदा दुबईतही झळकणार आहेत. त्यांच्या विविध दहा डिझाईन्सच्या कंदिलांना मुंबईसह परदेशातून मागणी मिळत असून, या उपक्रमातून आठ ते दहा महिलांना वर्षभर रोजगार मिळतो. विशेष म्हणजे, या कंदिलांच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्यातील काही भाग दुष्काळग्रस्तांना देण्याचा संकल्प शेखर सावंत यांनी केला आहे.
सातारा-पुणे महामार्गावरील आनेवाडी पुलाखाली शॉर्टसर्किटमुळे टोयोटा कंपनीच्या कारला आग लागून गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. रात्री सुमारे ११ वाजून २० मिनिटांनी ही घटना घडली. या गाडीचा क्रमांक MH 11 BH 4392 असा आहे. गाडीच्या वायरिंगमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
मध्ये रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत
सिग्नल यंत्रणेत बिघाट झाल्यामुळे वाहतूक धिम्या गतीने
मुलुंड ते ठाणे आणि कांजूर ते भांडुप अशा दोन ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड
बिघाडामुळे अप आणि डाउन जलद तसेच धीम्या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्या आहेत
मराठवाड्यातील ९३१ प्रकल्पांमधील पाणीसाठा अवघ्या ५४ दिवसांत ४९.६८ टक्क्यांवरून ४०.५८ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. त्यामुळे डिसेंबरपासूनच पाणीटंचाई तीव्र होण्याची शक्यता आहे. विभागातील मध्यम प्रकल्पांत केवळ १९.५७ टक्के, तर लघु प्रकल्पांत १४.४१ टक्के पाणी शिल्लक आहे. बीडमधील १४६ लघु प्रकल्पांत अवघा पाच टक्के साठा आहे. पुढील पावसाळ्यापर्यंत पाणी पुरवण्यासाठी प्रशासनाला काटेकोर नियोजन करावे लागणार आहे.
स्वारगेट चौकातच बसने घेतला पेट
रस्त्यावर पार्क केली होती बस.
घटनास्थळी पोलिस अग्निशमन दलाचे जवान दाखल.
येवला तालुक्यातील बदापूर येथे शेळी आणि बोकडाची चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. चोरट्यांनी एक शेळी आणि एक मोठा बोकड, अशी एकूण 40 हजार रुपये किमतीची जनावरे चोरून नेली आहेत. विशेष म्हणजे, चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, चोरटे बलेनो कारमधून आल्याचे फुटेजमध्ये दिसून आले आहे. ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहनतीने सांभाळलेल्या जनावरांची अशा प्रकारे चोरी होत असल्याने पशुपालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांनी आज मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी राज्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांची भेट घेतली. यावेळी नागरिकांनी त्यांच्याकडे विविध प्रश्न व समस्यांसंदर्भात निवेदने सादर केली. सुनेत्रावहिनी यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नागरिकांच्या समस्या समजून घेत त्यांना दिलासा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रश्नांवर योग्य कार्यवाही होण्यासाठी यावेळी त्यांनी संबंधित विषयांची माहिती घेतली.
मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे उशिराने
मुलुंडमध्ये ओवर हेड वायर कपडा अडकल्यामुळे वाहतूक उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक 10/15 मिनिट उशिरा
प्रवासी रेल्वे ट्रॅकवर उतरले
ताडीवाला रोड परिसरातील युवकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सार्वजनिक ठिकाणी हातात धारदार कोयता घेऊन फिरत असल्याचे व्हिडिओत दिसत असल्याची माहिती
भरदिवसा घडलेल्या कथित प्रकारामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
व्हायरल व्हिडिओमुळे ताडीवाला रोड परिसरात चर्चेला उधाण
व्हिडिओतील प्रकार नेमका कधी घडला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही
या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कारवाईबाबत माहिती मिळण्याची प्रतीक्षा
कर्जतमधील ग्रामस्थ आणि मनसे पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक
२८ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी बैठकीचं आयोजन
कर्जतमधील शेळके हॉलमध्ये आज संध्याकाळी होणार बैठक
टोरेंट जलविद्युत प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांचा कर्जत दौरा
टोरेंट प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व
राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी मनसेकडून जोरदार तयारी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये चोरट्यांनी एकाच रात्री शेजारील दोन बंगले फोडल्याने खळबळ उडाली आहे. वेरळ येथील समर्थ कृपा विश्व परिसरातील सूरज शेट्टी आणि प्रसन्न शरद चांदुगडे यांच्या बंगल्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले. शेट्टी यांच्या घरातून सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि दोन इम्पोर्टेड घड्याळे चोरीला गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर तपासासाठी रत्नागिरीहून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. श्वानपथकाने मुख्य प्रवेशद्वारापासून सर्व्हिस रोडपर्यंत माग काढला असून चोरट्यांचा शोध सुरू आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील दुर्गा टेकडी परिसरात होणाऱ्या वेस्ट एनर्जी प्रकल्पाला रावेत निगडी परिसरातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. दुर्गा टेकडी परिसरात वेस्ट एनर्जी प्रकल्प ऐवजी स्वर्गीय लोकनेते अजित पवार ऑक्सिजन पार्क उभारण्याची मागणी रावेत निगडी प्राधिकरण येथील रहिवाशांनी केली आहे. दुर्गा टेकडी वाचविण्यासाठी हजारो नागरिकांनी रस्त्यावर उतरून पिंपरी चिंचवड महापालिकेचा विरोध केला आहे. दुर्गा टेकडी परिसरात वेस्ट एनर्जी प्रकल्प आल्यास या भागातील नागरिकांना गंभीर आजारांच्या समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे. तसेच या भागातील झाडांची कत्तल होऊन हवा प्रदूषित होणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेने वेस्ट एनर्जी प्रकल्प उभारणे ऐवजी, ऑक्सीजन पार्क उभाराव अशी मागणी रावेत निगडी प्राधिकरण परिसरातील नागरिकांनी केली.
प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांना Form 6 भरून नाव नोंदवण्याची संधी.
मतदार यादीतील नाव किंवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी Form 8.
नाव समाविष्ट करण्यास हरकत घेण्यासाठी Form 7.
दावे-हरकतींची छाननी आणि निकाली काढण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होणार.
महाराष्ट्राची अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर 2026 रोजी प्रसिद्ध होणार.
महाराष्ट्राच्या राजकारणात 500 कोटींच्या कथित व्यवहारावरून मोठी खळबळ. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. या कथित व्यवहाराची ईडी आणि महाराष्ट्र पोलिसांमार्फत चौकशी करून पीएमएलएअंतर्गत कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे. 500 कोटी रुपये कुणी दिले, कुणाला दिले आणि पैसे जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचले नसतील, तर ते गेले कुठे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी जगतात वर्चस्व निर्माण करण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पिस्तूल तस्करीत सहभाग घेतल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात सिडको पोलिसांनी कारवाई करत तस्करीचे नेटवर्क उद्ध्वस्त केले असून, आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला 6 आरोपींकडून 4 पिस्तूल आणि 11 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली होती. आरोपींच्या चौकशीत तीन पिस्तूल आणि 9 जिवंत काडतुसे दोन व्यावसायिकांना दीड लाख रुपयांना विकल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी शुभम धर्मराज वाळके आणि कृष्णा विष्णू अधाने या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विक्रीसाठी दिलेली पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत आतापर्यंत एकूण 7 पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. सिडकोचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांनी ही माहिती दिली.
प्रवासी आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी
टोल देण्याच्या वादातून हा राडा झाल्याची माहिती
रात्रीच्या सुमारास झालेल्या हाणामारीत बसची काच फुटल्याची माहिती
हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबईत उभारणार जागतिक दर्जाचे मरीना; व्हिक्टोरिया डॉक येथे 923 कोटींचा प्रकल्प उभारणार. मुंबईत जागतिक दर्जाचे मरीना उभारण्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने जागतिक निविदा प्रसिद्ध. व्हिक्टोरिया डॉक येथे ‘विकसित भारत मुंबई मरीना’ हा प्रकल्प उभारण्यात येणार. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 923 कोटी रुपये खर्च अपेक्षित. इच्छुक कंपन्यांना 15 डिसेंबर 2026 पर्यंत निविदा सादर करता येणार. मरीना प्रकल्पामुळे मुंबईतील समुद्री पर्यटनाला चालना मिळण्याची अपेक्षा. हा प्रकल्प बांधा, वित्तपुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा (डीबीएफओटी) या तत्त्वावर राबविण्यात येणार. त्यासाठी 45 वर्षांची कंत्राट मुदत निश्चित करण्यात आली.
धनगर समाजाच्या प्रलंबित आरक्षणासाठी समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. या प्रश्नावर अहिल्यानगर येथे 1 डिसेंबर रोजी भव्य महामोर्चा काढण्याचा आणि मेळाव्यातून सरकारला अल्टिमेटम देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. आरक्षणाचा प्रश्न तब्बल 80 वर्षांपासून प्रलंबित आहे. 2014 मध्ये सत्तेवर आल्यास प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, 12 वर्षे लोटूनही परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याने भाजपा सरकारबद्दल तीव्र नाराजी पसरली आहे. संविधानिक हक्कासाठी मराठवाड्यानंतर आता पश्चिम व उत्तर महाराष्ट्रात आंदोलनाचा विस्तार करत व्यापक लढा उभारण्याचा निर्धार नेत्यांनी व्यक्त केला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील राजगुडा ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या राजगुडा, सलंगटोला, मंदीटोला, मोठा मोगरा आणि लहान मोगरा या पाच गावांत दारूबंदीच्या जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली. महिला बचत गटांच्या सदस्यांसह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत दारूबंदीचा संदेश दिला. सुमारे 2 हजार 500 लोकसंख्या असलेल्या या 5 गावांत दारूबंदीचा विषय ऐरणीवर आला आहे. गावांतील काही दुकानदारांकडून दारूविक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महिलांनी एकजूट दाखवत जनजागृतीचा पुढाकार घेतला.
महामेट्रोला 19 व्या ‘अर्बन मोबिलिटी इंडिया’ परिषदेत ‘सर्वोत्कृष्ट प्रदर्शक’ पुरस्कार. केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्वीकारला पुरस्कार. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत महामेट्रोचा गौरव. महामेट्रोकडून डिजिटल प्रोजेक्ट मॅनेजमेंट, प्रवासी सुरक्षा आणि ‘वन ॲप’ यांसारख्या अत्याधुनिक प्रणालींचे सादरीकरण. 2047 पर्यंत भारतातील 80 कोटी नागरिक शहरांमध्ये राहतील. सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याची केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांची भूमिका. भारतात सध्या सुमारे 1,185 किलोमीटरचे मेट्रो जाळे कार्यरत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर. त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन साधू-महंतांशी आगामी कुंभमेळ्याच्या तयारीसंदर्भात करणार चर्चा. ‘भगवा खांद्यावर, शिवसैनिक बांधावर’ या उपक्रमाची नाशिकमधून सुरुवात. हरसूल येथे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप करणार. हरसूल परिसरातील १० हजार शेतकऱ्यांना आनंदाचा शिधा वाटप करण्याचे नियोजन. जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी कुंभमेळ्याच्या कामांचा घेणार आढावा. नाशिकमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना. गंगापूर रोडला समांतर रस्त्याचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन. गेल्या काही महिन्यांपासून कुंभमेळ्यांच्या कामापासून दूर राहणारे एकनाथ शिंदे आज आढावा घेणार असल्याने या दौऱ्याकडे लक्ष.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कत्तलीच्या उद्देशाने बंद कंटेनरमधून गोवंशांची अवैध वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शहर गुन्हे शाखेने जालना रोडवरील केंब्रिज चौक परिसरात कारवाई करत २९ गोवंशांची सुटका केली असून, तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत कंटेनरसह सुमारे 30 लाख 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम आणि प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणात एकूण सहा आरोपींचा उल्लेख असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे.
अभिनेता इमरान खान सीजेपी च्या समर्थनार्थ मुंबईत पुकारलेल्या आंदोलनासाठी आला होता. यावेळी पोलिसांनी काही वेळ त्याला ताब्यात घेतले आणि सोडून दिले. मात्र त्यानंतर इम्रान खान हा भारतीय नागरिक नसून ते अमेरिकन नागरिक आहे त्यामुळे त्याने 28 ऑक्टोबरपर्यंत देश सोडून जावे अशी नोटीस मुंबई पोलिसांनी दिली होती. त्यानंतर इमरान खान यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या संदर्भात उच्च न्यायालयात सुनावणी पार पडणार.
मुंबईतील घाटकोपर पश्चिम येथील पुरातन खंडोबा टेकडी परिसराचा विकास आणि सुशोभीकरण करण्यासाठी मुंबई महापालिकेने 5 कोटी 79 लाख 89 हजार रुपयांचा खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. ‘एन’ विभागातील जय मल्हार सहायक्य कमिटी आणि खंडोबा मंदिर देवस्थान समितीच्या सदस्यांनी पुरातन खंडोबा मंदिर व डोंगर परिसराच्या विकासाची मागणी केली होती. त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांनी स्थळपाहणी करून विकासकामांचे अंदाजपत्रक तयार केले. या कामासाठी कंत्राटदार कंपनीची निवड करण्याची शिफारस करण्यात आली असून, कंत्राटदाराने कार्यालयीन अंदाजापेक्षा 3.33 टक्के कमी दराने निविदा सादर केली आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर ठेवण्यात आला आहे.
आंबेगाव पोलीस ठाण्याच्या तपास पथकाची कारवाई; दत्तनगर परिसरातून तिघांना घेतले ताब्यात
तळोजा येथील शिवाजी चौकाजवळ मारवा बिल्डिंगच्या खाली २४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १ वाजून १७ मिनिटांच्या सुमारास घडली होती गोळीबाराची घटना
आर्थिक व्यवहाराच्या वादातून फिर्यादीला मारहाण करून पिस्तूलमधून गोळीबार केल्याचा आरोपींवर आरोप
गोळीबारात फिर्यादी गंभीर जखमी; जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
रुद्र दादासाहेब बारवकर (वय १९), अनिकेत प्रताप नरवडे (वय १९) आणि सौरभ गोरख चौधरी (वय २४) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे
आरोपी दत्तनगर परिसरात असल्याची आंबेगाव पोलिसांना मिळाली होती गोपनीय माहिती
पोलीस अंमलदार धनाजी धोत्रे आणि सचिन गाडे यांच्या माहितीच्या आधारे तपास पथकाने सापळा रचून तिघांना घेतले ताब्यात
पुढील कारवाईसाठी तिन्ही आरोपींना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी मुंबईत दाखल. आंतरराज्यीय वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेणार भेट. मुंबईतील विमानतळावर काल रेवंत रेड्डी यांचे आगमन. आज सकाळी 11 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार. तुम्मिडीहट्टी बॅरेजच्या प्रस्तावावर बैठकीत चर्चा होणार. बॅरेजसाठी महाराष्ट्राच्या संमतीसाठी तेलंगणा सरकारचे प्रयत्न. 152 मीटर पूर्ण जलसाठा पातळीवर (FRL) बॅरेज उभारण्याचा तेलंगणाचा प्रस्ताव. महाराष्ट्राची भूमिका काय असणार? बैठकीकडे लक्ष. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व प्राप्त.
बारामतीमध्ये सूर्यवंशी याच्यावर झालेल्या “कथित हल्ला” प्रकरणात चौकशी पूर्वीच राणा पसार. राणा शिपिंग कंपनीचा चालक व व्यावसायिक राणा सूर्यवंशी हा पोलिसांच्या पुढील चौकशीपूर्वीच पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातून धूम ठोकून पसार. त्याच्या शोधासाठी काही पोलिसांनी फिरवली चक्रे. हल्ला प्रकरणात कटात सहभागी असलेल्या राणा सूर्यवंशीच्या निकटवर्तीयांवर व साथीदारांवर बारामती पोलिसांनी गुन्हे दाखल. 18 ऑक्टोबर रोजी बारामती विमानतळानजीक आपल्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची तक्रार राणा सूर्यवंशी याने बारामती पोलिसांकडे दिली होती.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.