पदवीधर मतदारांनी लोकशाहीवर निष्ठा ठेवून मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत पदवीधरांची ताकद गृहीत धरता येणार नाही, हे मतदारांनी दाखवून दिले.पहिल्याच फेरीत मोठ्या मतांनी विजय मिळेल, असा विश्वास प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केला. पुढील दहा वर्षांत पदवीधरांसाठी काय काम करणार, याचे नियोजन जाहीरनाम्यात मांडले. विरोधी पक्षांवर टीका करण्याऐवजी स्वतःचा विकासाचा अजेंडा मतदारांसमोर ठेवला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक.राज्यातील 304 दुष्काळी तालुक्यांमधील उपाययोजनांचा घेणार आढावा घेणार आहे. ज्यात शेतकरी आणि शेतमजुरांसह विद्यार्थ्यांसाठी घोषित मदतीचा घेणार आढावा घेणार असून पिण्याचे आणि शेतीचे पाणी, जनावरांचा चारा उपलब्धतेबाबत महत्वाचे आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
आज सायंकाळी 4.00 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर पार पडणार बैठक. किसान सभेचे पदाधिकारी थोड्याच वेळात मुंबईच्या दिशेने बैठकीसाठी होणार रवाना.अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोलेतून काल मुंबईच्या दिशेने निघाला आहे वाहन लॉंग मार्च
धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून 'फॉर्म ७' चा गैरवापर करून हजारो वैध मतदारांची नावे बेकायदेशीरपणे वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) वतीने करण्यात आला आहे. माजी आमदार डॉ. फारुख शाह यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याप्रकरणी अप्पर तहसीलदारांना निवेदन दिले असून, अल्पसंख्याक व विशिष्ट भागातील सुमारे ३० हजार मतदारांना खोट्या कारणांवरून लक्ष्य केले जात असल्याचा दावा केला आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदार संघासाठी मतमोजणी सुरू होत आहे. त्यासाठी भाजपाच्या बंडखोर उमेदवार तथा राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे या अमरावतीच्या लोकशाही भवन मध्ये मतमोजणी प्रक्रियेसाठी दाखल झाल्या आहे. माझे भाऊ अनिल बोंडे यांचा मला आशीर्वाद आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या बंडखोर संगीता शिंदे यांनी दिली.