अंत्यसंस्काराच्या जेवणासाठी निघाले, पण घरी परतलेच नाहीत! गंगेतील नाव दुर्घटनेने बिहार हादरलं, 13 जणांचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : बिहारमधील वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटून भीषण दुर्घटना घडली. या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

अंत्यसंस्काराच्या जेवणासाठी निघाले, पण घरी परतलेच नाहीत! गंगेतील नाव दुर्घटनेने बिहार हादरलं, 13 जणांचा मृत्यू
Tragic Bihar Boat Accident

बिहारमधील वैशाली जिल्ह्यात एक हृदयद्रावक दुर्घटना घडलेली आहे. हाजीपूर येशील राघोपूरमधील गावात गंगेत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली आणि एकच हाहाकार उडाला. मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी साधारण संध्याकाळी घडलेल्या या अपघातात तब्बल 15 जणांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत असून अनेकजण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त होत आहे.

क्षणात होत्याचं नव्हतं
मिळालेल्या माहितीनुसार, नावेत 35 ते 40 प्रवासी होते. हे सर्वजण अंत्यसंस्काराच्या जेवणासाठी निघाले होते. याचदरम्यान नदीच्या मधोमध अचानक नाव पलटी झाली. प्राथमिक अंदाजानुसार,क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हा अपघात घडला असावा. मृतांमध्ये महिलासह लहान मुलांची संख्या जास्त आहे.

हेही वाचा-महामार्गावर भीषण अपघात! भाजपच्या माजी खासदाराच्या ताफ्यातील कार दुभाजकाला धडकली; एकाचा दुर्दैवी मृत्यू

महिला आणि लहान मुलांचाही समावेश
संबंधित दुर्घटना ही विरोधी पक्षनेते तेजस्ती यावद यांच्या मतदारसंघात घडलेली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी जीवाची बाजी लावून बचावकार्य सुरु केले. काही स्थानिकांनी नदीत उडी घेत बुडणाऱ्यांना बाहेर काढले. काही जणांनी पोहत किनारा गाठत स्वत:चा जीव वाचवला. याच दरम्यान, प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

SDRF च्या पथकालाही बोलावण्यात आले असून अजून ही शोधमोहीम सुरु असल्याची माहिती आहे. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आहे. सध्या मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून प्रशासनाने अजूनही अधिकृत आकडा जाहीर केलेला नाही.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number