गरब्याच्या तालावर थिरकताना गुडघे आणि घोट्यांवर येतोय ताण? ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका

नवरात्रीच्या नऊ रात्री गरबा आणि दांडियाचा उत्साह काही औरच असतो. तासनतास न थांबता नाचल्यामुळे शरीराला थकवा येतोच, पण सर्वात जास्त परिणाम गुडघे आणि घोट्यांवर होतो. चुकीची पद्धत किंवा तयारी नसल्यास सूज, मुरगळणे आणि सांधेदुखीचा त्रास सुरू होऊ शकतो.
गरब्याच्या तालावर थिरकताना गुडघे आणि घोट्यांवर येतोय ताण? ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
Navratri 2026

नवरात्रीच्या नऊ ही रात्री गरबा आणि दांडियाचा उत्साहा काही वेगळाच असतो. तासनतास न थांबता नाचल्यामुळे शरीराला थकवा येतोच, पण सर्वात जास्त परिणाम होतो तो म्हणजे गुडघे आणि पायांच्या घोट्यांवर. चुकीची पद्धत किंवा योग्य तयारी न केल्याने पायाला सूज येणे, पाय मुरगळणे आणि सांधेदुखीचा त्रास सुरु होऊ शकतो. त्यामुळे नाचण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवण अत्यंत गरजेच्या आहेत.

योग्य चपला निवडा : अनवाणी घरबा खेळण्याऐवजी हलके, मऊ असलेले आणि पायाच्या घोट्याला आधारे देणारी चप्पल किंवा बूट वापरावे. महत्त्वाचे म्हणजे उच्च टाचेच्या चपला टाळा, त्यामुळे तोल जाऊन दुखापत होण्याची शक्यता जास्त वाढते.

हेही वाचा-नवरात्रीत गरबा खेळताना थकवा येतोय? या 4 चुका टाळा, नाहीतर डिहायड्रेशनमुळे..

वॉर्मअपला विसरुन नका : कधीच थेट गरबा सुरु करु नका. सुरुवातील 5 मिनिटे तरी स्ट्रेचिंग करा. गुडघे, घोटे आणि पोटऱ्यांना हलका व्यायाम दिल्यास पायांचे स्नायू हे सैल होतात आणि दुखापतीचा ही धोका कमी होतो.

विश्रांती महत्त्वाची : गरबा खेळताना तो निसरड्या किंवा असमान जमिनी असलेल्या ठिकाणी खेळू नका. दर अर्ध्या तासाने 5 मिनिटांचा ब्रेक घ्या आणि भरपूर पाणी प्या, जेणेकरुन पायांच्या स्नायूंमध्ये क्रॅम्प येणार नाहीत.

हेही वाचा-केस चिकट झाल्याने गरब्याचा मूड ऑफ होतोय?, घामापासून बचावासाठी वापरा 5 हेअर केअर टिप्स

दुखण्याकडे दुर्लक्ष करु नका : जर गरबा खेळताना तुम्हाला वेदना किंवा सूज जाणवली असेल तर लगेच थांबा. पहिल्यांदा तर बर्फाने शेक द्या आणि गरज असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. थोडी काळजी घेतली तर नवरात्र आनंदात आणि निरोगी पार पडेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version