नवरात्रीमध्ये गरबा आणि दांडियाचा उत्साह हा शिगेला असतो. पण तासनतास नाचल्याने घास येतो आणि त्याचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या केसांवर होते. केस चिकट होणे, कोंडा होणे, केस गळणे आणि विशेष म्हणजे केसांना दुर्गंघी येणे अशा अनेक समस्या जाणवतात. जर तुम्हालाही हीच समस्या येत असेल तर खाली दिलेल्या फक्त 5 सोप्या टिप्स फॉलो करा.
1) गरब्यापूर्वी केसांना तेल लावणे टाळा
पहिल्यांदा तर हे लक्षात ठेवा की, गरबा किंवा दांडीया खेळण्यापूर्वी केसांना तेल लावू नका, असे केल्यास घाम आणि तेल मिस्क होऊन केस अधिक चिकट होतात. त्यामुळे 9 दिवसांत हलके सीरम किंवा लिव्ह-इन कंडिशनर वापरा.
2) सुती रुमाल किंवा बँड वापरा
गरबा खेळायला जाताना केस मोकळे ठेवू नका. केसांची घट्ट बांधणी का किंवा सुती स्कार्फ वापरावे. त्यामुळे घाम थेट केसांच्या मुळांपर्यंत जाणार नाही.
3) ड्राय शॅम्पू जवळ ठेवा.
गरबा खेळून घरी आल्यानंतर रोज केस धुणे कोणालाच शक्य नसते. अशा वेली ड्राय शॅम्पू हा बेस्ट पर्याय आहे. त्यामुळे केसांमधील अतिरिक्त तेल आणि घाम ही शोषला जातो. महत्त्वाचे म्हणजे केस फ्रेश दिसतात.
4) कोरफड जेलचा वापर
गरब्याला जाण्यापूर्वीच केसांच्या मुळांना थोडे कोरफड जेल वापरावे. कोरफडीमुळे टाळूला थंडावा मिळतो आणि घामही कमी येतो.
5) विशेष म्हणजे गरब्यानंतर केसांची काळजी
घरी आल्यानंतर केस मोकळे करा आणि थंड हवेने पहिल्यांदा सुकवावे. आठवड्यातून दोनदा तरी सौम्य शॅम्पूने केस धुवा. यामुळे कोंडा आणि दुर्गंधीची समस्या दूर होईल आणि तुमचे केस 9 दिवस सुंदर राहतील.