तीच तीच ऑक्सिडाइज्ड रिंग घालणं सोडा! यंदाच्या नवरात्रीत ‘या’ स्टायलिश रिंग्सने गरबा नाईटला द्या रॉयल टच

नवरात्रीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी गरब्यासाठी मुली सुंदर असा लूक करून येतात. मात्र यावेळीस ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सोडली तर घागऱ्यावर कोणती ज्वेलरी घालावी हे मुलींना सुचत नाही. मात्र आम्ही काही अशा स्टायलिश रिंग्सची आयडिया घेऊन आलोय ज्यामुळे तुमच्या गरबा नाईटला रॉयल टच मिळणार आहे.

तीच तीच ऑक्सिडाइज्ड रिंग घालणं सोडा! यंदाच्या नवरात्रीत ‘या’ स्टायलिश रिंग्सने गरबा नाईटला द्या रॉयल टच
Navratri 2026 jewellery idea
Navratri 2026 jewellery idea

कुंदन स्टेटमेंट रिंग (Kundan Statement Ring)
नवरात्रीला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी गरब्यासाठी मुली सुंदर असा लूक करून येतात. मात्र यावेळीस ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी सोडली तर घागऱ्यावर कोणती ज्वेलरी घालावी हे मुलींना सुचत नाही. मात्र आम्ही काही अशा स्टायलिश रिंग्सची आयडिया घेऊन आलोय ज्यामुळे तुमच्या गरबा नाईटला रॉयल टच मिळणार आहे. यात पहिला आहे ‘कुंदन स्टेटमेंट रिंग’. कुंदन स्टेटमेंट रिंग गरबा नाईटला जाताना तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर आणि रॉयल टच हवा असेल, तर कुंदन स्टेटमेंट रिंग हा एक परफेक्ट पर्याय ठरू शकतो. यात लाल, हिरवे, पांढरे खडे असलेली अंगठी पारंपरिक चनिया चोळी, सुंदर लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत एक वेगळीच शोभा देते.

navratri 2026 jewellery idea

हाथफूल रिंग डिझाइन(hath phool chain Ring)
नवरात्रीच्या रंगतदार वातावरणात गरबा नाईटला जाताना तुमच्या लूकमध्ये ग्लॅमर आणि पारंपरिक लूक हवा असेल तर तुम्ही हाथफूल रिंग डिझाइन ट्राय करु शतका. गोल्डन, पांढऱ्या किंवा रंगीत खड्यांची हाथफूल रिंग हातांचे सौंदर्य खुलवण्यासोबतच तुमच्या स्टाइलला फेस्टिव्ह आणि एलिगंट लुक देईल.

navratri 2026 jewellery idea

मीनाकारी रिंग (Meenakari Finger Ring)
रंगीबेरंगी डिझाइन, आकर्षक नक्षीकाम आणि सुंदर रंगसंगतीमुळे मीनाकारी रिंग तुमच्या पारंपरिक लूकमध्ये खास भर घालते. चनिया चोळी, घेरदार लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत ही रिंग सहज उठून दिसते. नवरात्रीच्या गरबा नाईटला जाताना आपल्या लूकमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि मॉडर्न स्टाइलचा सुंदर मिलाफ मीनाकारी रिंग आहे.

navratri 2026 jewellery idea

फ्लोरल रिंग (Flower Ring)
नवरात्रीच्या गरबा नाईटला जाताना आपल्या लूकमध्ये फ्रेशनेस, एलिगन्स आणि ट्रेंडी स्टाइलीश लूकसाठी फ्लोरल रिंग हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फुलांच्या आकारातील आकर्षक डिझाइन आणि नाजूक कलाकुसर असलेली फ्लोरल रिंग तुमच्या पारंपरिक लूकला मॉडर्न आणि स्टायलिश बनवते.

navratri 2026 jewellery idea

मोराच्या नक्षीची रिंग (Peacock Finger Ring)
रंगीबेरंगी चनिया चोळी, सुंदर लेहेंगा किंवा इंडो-वेस्टर्न आउटफिटसोबत मोराची नक्षीकाम असलेले अंगठी भारतीय संस्कृतीची झलक दाखवतात. ही रिंग तुमच्या गरबा लूकमध्ये एक वेगळीच मोहकता आणू शकते. या रिंगसोबत हातात कमी बांगड्या आणि कानात सुंदर झुमके घातल्यास तुमच्या लूकमध्ये परफेक्ट बॅलन्स साधता येईल.

navratri 2026 jewellery idea

मल्टी-फिंगर रिंग (silver Multi-finger ring)
नवरात्रीच्या गरबा नाईटला जाताना आपल्या लूकमध्ये काहीतरी हटके, बोल्ड आणि ट्रेंडी स्टाइलचा तडका लावायचा असेल, तर मल्टी-फिंगर रिंग हा एक परफेक्ट ज्वेलरी पर्याय ठरू शकतो. दोन किंवा अधिक बोटांवर एकाच वेळी आकर्षक दिसणारी ही रिंग तुमच्या पारंपरिक लूकला मॉडर्न आणि फॅशनेबल टच देते. गोल्डन, सिल्व्हर, ऑक्सिडाइज्ड किंवा स्टोनवर्क असलेले डिझाइन्स तुमच्या स्टाइलला अधिक आकर्षक बनवू शकतात.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number