ऐन नवरात्रौत्सवात सप्तशृंगी गडावर FDA ची धडक कारवाई; तब्बल 5.62 लाख रुपये किमतीची 1,408 किलो मिठाई केली नष्ट

नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गड येथे FDA ने केलेल्या धडक कारवाईत 1,408.7 किलो मिठाईचा साठा नष्ट करण्यात आला आहे. 

ऐन नवरात्रौत्सवात सप्तशृंगी गडावर FDA ची धडक कारवाई; तब्बल 5.62 लाख रुपये किमतीची 1,408 किलो मिठाई केली नष्ट
saptashrungi gad

नगर : नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या सप्तशृंगी गड येथे अन्न व औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या धडक कारवाईत 1,408.7 किलो अस्वच्छ आणि पामतेलयुक्त मावासदृश्य मिठाईचा साठा जागीच नष्ट करण्यात आला आहे.  नवरात्रीदरम्यान होणाऱ्या भाविकांच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) नाशिक विभागाने सप्तशृंगी गडावर राबवलेल्या विशेष अन्न सुरक्षा तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत अनेक खाद्य आस्थापनांचा समावेश होता. ज्यामध्ये एफडीएने 13 आस्थापनांवर कारवाई केली आणि तपासणीसाठी 18 अन्नाचे नमुने गोळा केले. एफडीएच्या म्हणण्यानुसार, नष्ट केलेल्या साठ्यामध्ये पाम तेलाचा वापर करून तयार केलेल्या माव्यासारख्या मिठाईंचा समावेश होता. अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, या उत्पादनांची वाहतूक आणि साठवणूक असुरक्षित परिस्थितीत केली जात होती. त्यावर अनिवार्य लेबलिंग नव्हते. दरम्यान, 5,62,090 किमतीचा हा साठा खाण्यासाठी अयोग्य ठरवून नष्ट करण्यात आला आहे.

हेही वाचा : महायुतीत पुन्हा ठिणगी? एकनाथ शिंदे नाराज?; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

एफडीएचे सहआयुक्त मंगेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (झोन 4) संदीप देवारे यांच्या देखरेखीखाली ही तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान, देवारे यांनी पेढा विक्रेत्यांशी संवाद साधला आणि त्यांच्या शंका व अडचणींचे निराकरण केले. त्यांनी अन्न सुरक्षा नियम, स्वच्छतेचे मानके आणि योग्य साठवणूक व हाताळणीच्या पद्धती यांबद्दल मार्गदर्शन केले. देवारे यांनी अन्न व्यवसाय चालकांना अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006 आणि संबंधित नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. तसेच व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आवश्यक परवाने किंवा नोंदणी मिळवावी आणि अन्नाची गुणवत्ता व स्वच्छता राखावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number