महायुतीत पुन्हा ठिणगी? एकनाथ शिंदे नाराज?; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे.

महायुतीत पुन्हा ठिणगी? एकनाथ शिंदे नाराज?; उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ‘या’ भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Eknath Shinde

महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा खळबळ उडाली असून महायुतीमधील सर्वकाही आटोक्यात असल्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीवर नाराज असल्याची चर्चा जोरदार रंगली आहे. अवघ्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या अधिकृत निवासस्थानी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक बोलावण्यात आली होती.

हेही वाचा – मोठी बातमी! प्रदीप पूर्णेकरप्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती खंडणीविरोधी पथकाच्या रडारवर

या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती अनिवार्य मानली जात असताना, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार दोघेही या बैठकीला गैरहजर राहिले. त्यानंतर आज आयोजित केलेल्या कचरा व्यवस्थापन आढावा बैठकीकडेही एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवली. प्रशासकीय वर्तुळात या गैरहजेरीचे कारण देताना त्याच वेळेस ‘नंदनवन’ बंगल्यावर नियोजित असलेली पत्रकार परिषद असल्याचे सांगण्यात आले, तरी भाजपच्या प्रमुख नेत्यांकडून आपल्याला डावलले जात असल्याची भावना त्यांच्या मनात आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

महायुतीत अंतर्गत धुसफूस

सुनेत्रा पवार यांच्या बाबतीत सांगायचे तर, त्या स्थानिक सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असल्यामुळे बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत. परंतु, एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मात्र मागील काही घटनांमधून त्यांची नाराजी अतिशय ठळकपणे समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून बाजूला सारल्यापासून आणि सत्तासंतुलन बदलल्यापासून त्यांच्यामध्ये व भाजप नेतृत्वात एकप्रकारची राजकीय स्पर्धा आणि धोरणात्मक मतभेद दिसून आले आहेत. विरोधकांकडून सध्या राज्य सरकारला कोंडीत पकण्यासाठी वातावरण तापवले जात असून, अशा संवेदनशील टप्प्यावर महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकते.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number