सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय; राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण, सुनील तटकरे म्हणाले..

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा पहिलाच मोठा विजय असल्याने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवारांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय; राष्ट्रवादीत जल्लोषाचे वातावरण, सुनील तटकरे म्हणाले..
sunetra pawar

Sunetra Pawar Someshwar Sugar Factory Election Win: बारामतीमधील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अत्यंत महत्त्वाच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दणदणीत विजय मिळवत 21 पैकी सर्व 21 जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली मिळालेला हा पहिलाच मोठा विजय असल्याने संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या दणदणीत विजयानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘अजितदादांनी ग्रामीण भागात निर्माण केलेली घट्ट पकड आजही कायम आहे’; तटकरे यांचे विधान
सुनील तटकरे यांनी विजयावर भाष्य करताना सांगितले की, ‘अजितदादांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आणि सहकार क्षेत्रात आपली पकड अत्यंत मजबूत केली होती. आज वहिनींच्या (सुनेत्रा पवार) नेतृत्वाखाली लढवल्या गेलेल्या या निवडणुकीत सर्वच्या सर्व 21 जागांवर विजय मिळून हेच सिद्ध झाले आहे की, दादांनी निर्माण केलेली तीच जुनी पकड आणि लोकांचा विश्वास आजही ग्रामीण भागात कायम आहे.’ दरम्यान, काल पार पडलेल्या एका बैठकीला सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, वहिनी बारामतीमध्ये असल्यामुळे आणि मुख्यमंत्री त्यांच्या शासकीय कामात व्यस्त असल्यामुळे येऊ शकले नाहीत, परंतु दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना सरकारकडून न्याय दिला जाईल.

ईव्हीएम आणि विरोधकांच्या भूमिकेवर सुनील तटकरे यांचा जोरदार प्रहार
यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाबाहेर आणि दिल्लीत विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनावर व ईव्हीएमवरील आक्षेपांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘वर्ष 2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएमच्या माध्यमातूनच निवडणुका झाल्या आणि देशात युपीएचे सरकार आले, तेव्हा सर्वांना ईव्हीएम योग्य वाटत होते. मात्र, 2014 पासून एनडीएला देशभरात बहुमत मिळू लागताच ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणे सुरू झाले, जे पूर्णपणे चुकीचे आहे.’ पराभवाचे खापर नेहमी दुसऱ्यावर फोडण्याची आणि विजयाचे श्रेय स्वतःकडे घेण्याची विरोधकांची ही भूमिका योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.

हेही वाचा – गाड्या धुताय? सावधान! पिण्याच्या पाण्याची नासाडी केल्यास भरावा लागणार तब्बल 5000 हजारांचा दंड

सरन्यायाधीशांची भेट मागण्याची परंपरा अयोग्य; न्यायव्यवस्था आणि संविधानावर भाष्य
विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांची भेट मागितल्याच्या मुद्द्यावर बोलताना तटकरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी म्हटले की, ‘आपल्या देशात लोकशाही व्यवस्था आणि स्वतंत्र न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे. कायदे बनवण्याचे काम संसद किंवा विधानसभा करते आणि न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याचे मार्ग खुले असतात. परंतु, सरन्यायाधीशांची भेट मागण्याची मागणी मी माझ्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच पाहत आहे.’ लोकसभा आणि विधानसभेत अनेक वर्षे काम करूनही अशा प्रकारची मागणी कधीही पाहिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

परदेशी फंडिंगच्या मुद्यावर आणि विरोधकांच्या आंदोलनावर प्रतिक्रिया
CJP च्या आंदोलनाबाबत परदेशातून होत असलेल्या फंडिंगच्या आरोपांवर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, ‘मला या फंडिंगबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही, मात्र देशाबाहेरील शक्तींकडून देश अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असेल तर ते योग्य नाही. केंद्र सरकार याबाबत योग्य ती माहिती घेऊन योग्य भूमिका घेईल.’ एनडीए सरकारला बदनाम करण्याचे कितीही प्रयत्न झाले तरी विरोधकांना त्यांचे काम करू द्यावे, आपली लोकशाही प्रगल्भ आहे आणि विरोधी पक्षांनी आपली भूमिका ठरवावी, असे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा – कर्जवसुलीसाठी घरी पोहोचले; पतीच्या पाठी कर्मचाऱ्यांनी पत्नीचा…; अकोल्यातील ”तो’ VIDEO व्हायरल 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number