विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाचा मोठा निर्णय बदलला; आता थेट 2027 मध्ये…

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस 1 च्या पुनर्विकाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे कामकाज हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव नेमका किती दिवसांसाठी पुढे ढकलेला आहे, जाणून घ्या.
Navi Mumbai International Airport
विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस 1 च्या पुनर्विकाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानसेवांचे कामकाज हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर हलवण्याचा निर्णय काही काळासाठी पुढे ढकण्यात आलेला आहे. हा प्रस्ताव नेमका किती दिवसांसाठी पुढे ढकलेला आहे, जाणून घ्या.

उड्डाणांचे स्थलांतर लांबणीवर
विमान कंपन्यांच्या तीव्र विरोधानंतर विमानतळ प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई विमानतळावरुन सध्या 46 विमान कंपन्या या दर आठवड्याला साधारण 770 आंतरराष्ट्रीय उड्डाणे चालवतात. टर्मिनल 1 च्या पुनर्विकासासाठी त्यापैकी 33 टक्के म्हणजेच साधारण 265 साप्ताहिक उड्डाणांचे स्लॉट हे काही काळासाठी कमी करण्याचा किंवा संबंधित सेवा या नवी मुंबई विमानतळावर हलवण्याचा प्रस्ताव होता. हा बदल येत्या 25 ऑक्टोबरपासून लागू करण्याचे नियोजन केले होते. मात्र, आता अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे विमान कंपन्यांनी विरोध दर्शवलाय.

हेही वाचा-भेसळखोरांचे धाबे दणाणले! नवरात्रोत्सवात FDA ची राज्यभर धडक मोहीम; मुंबईतील 17 नामांकित आस्थापनांवर कारवाई

नेमकं काय ठरलं?
हिवाळी वेळापत्रकासाठी सर्व स्लॉट तसेच उड्डाणांचे नियोजन हे आधीच ठरलेले होते. मात्र अचानक हा बदल केल्याने संपूर्ण वेळापत्रक कोलमडले गेले असून प्रवाशांची गैरसोय होईल, अशी भूमिका आता विमान कंपन्यांनी मांडली आहे. विमान कंपन्यांची हीच अडचण लक्षात घेता विमानतळ प्रशासनाने हा निर्णय थेट मार्च 2027 पर्यंत पुढे ढकलेला आहे. त्यामुळे आता हिवाळी हंगामातील आंतरराष्ट्रीय प्रवास सुरळीत राहणार असून टर्मिनल 1 च्या पुनर्विकासालाही बराच वेळ मिळेल.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version