22 तासांचा प्रवास आता 16 तासांत! मुंबईहून धावणार देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर; मार्ग अन् थांबे कोणते?

Vande Bharat Sleeper : रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार, कधी सुरु होणार जाणून घ्या.

22 तासांचा प्रवास आता 16 तासांत! मुंबईहून धावणार देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर; मार्ग अन् थांबे कोणते?
vande Bharat Sleeper

रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. देशातील दुसरी वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस ट्रेन लवकरच सुरु होणार आहे. ही ट्रेन कोणत्या मार्गावर धावणार, कधी सुरु होणार आणि कोणत्या-कोणत्या स्थानकांवर थांबणार, जाणून घ्या सविस्तर माहिती.

दोन प्रमुख शहरांना जोडणार
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि बंगळूर या दोन प्रमुख शहरांना जोडण्यासाठी ही एक्स्प्रेस सुरु करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती सध्या समोर येत आहे. खंर तर येत्या दसऱ्यानंतर ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. त्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकदरम्यान प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांचे या नव्या रेल्वेसेवेकडे लक्ष लागलेले आहे.

हेही वाचा-विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मुंबई विमानतळाचा मोठा निर्णय बदलला; आता थेट 2027 मध्ये…

सध्या पाहिलं तर मुंबई ते बंगळूरदरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी तब्बल 22 तास लागतात. मात्र, या वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेसमुळे हा प्रवास फक्त 16 तासांत पूर्ण होऊ शकतो, अशी शक्यता आहे. म्हणजे प्रवासाचे जवळपास 6 तास वाचू शकतात. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि पर्यटनासाठी या मार्गावर येणाऱ्यांना याचा विशेष फायदा होऊ शकतो.

असं असेल वेळापत्रक
सध्या मिळालेल्या वेळापत्रकानुसार, बंगळूरहून ही गाडी रात्री 10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजून 50 मिनिटांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल, अशी शक्यता आहे. मुंबईवरुन परतीच्या प्रवासासाठी रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी गाडी सुटण्याचे नियोजन ही असल्याची माहिती समोर आहे.

हेही वाचा-सायन उड्डाणपूल तयार, पण सुरू होईना, उद्घाटनाबाबत मोठी अपडेट समोर

थांबे कोणते असतील?
या गाडीच्या मार्गावरमध्ये कल्याण, सोलापूर, कलबुर्गी, कलबुर्गी, रायचूर, गुंतकल आणि अनंतपूर या स्थानकांचा समावेश असू शकतो. मात्र, अंतिम वेळापत्रक आणि थांब्यांबाबत अधिकृत घोषणा झाल्यानंतर निश्चित माहिती ही स्पष्ट होईल.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number