सायन उड्डाणपूल तयार, पण सुरू होईना, उद्घाटनाबाबत मोठी अपडेट समोर

Sion Railway Overbridge : मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपुलाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ऑगस्ट २०२४ पासून बंद असलेल्या या पुलाच्या उद्घाटनाची प्रतीक्षा अद्याप कायम आहे. वारंवार बदललेल्या मुदतीनंतरही पूल सुरू न झाल्याने वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

सायन उड्डाणपूल तयार, पण सुरू होईना, उद्घाटनाबाबत मोठी अपडेट समोर
Sion Railway Overbridge Update

मुंबई : मुंबईतील सायन रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचा मुहूर्त काही केल्या मिळताना दिसून येत नाही. 15 ऑक्टोबरचा अर्थात आजचा उद्घाटचा मुहूर्त देखील हुकला असून ऑगस्ट 2024 पासून हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पुलाची सर्व कामे पूर्ण झाली असून पुनर्बांधणी देखील 100 टक्के पूर्ण झालेली आहे. मात्र, उद्घाटनासाठी मुहूर्तच मिळत नसल्याने हा पूल अजूनही बंदच आहे.

सुरुवातील मे 2026 आणि त्यानंतर ऑगस्ट 2026 अशी मुदत देण्यात आलेली होती. काम पूर्ण न झाल्यामुळे डेडलाईन पुढे ढकलून 30 सप्टेंबर करण्यात आली, त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत ही सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन होते. पण आजचा देखील मुहूर्त हुकल्याने उद्घाटन कधी होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. हा पूल सुरु झाल्यानंतर सायन, धारावी आणि एलबीएस या मार्गावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number