भारतामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी तिकीट कन्फर्म होणे ही मोठी चिंता असते. विशेषतः सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात वेटिंग लिस्ट झपाट्याने वाढते. अशा वेळी तिकीट कन्फर्म होईल की नाही, याबाबत अनेकांना संभ्रम निर्माण होतो. मात्र, वेटिंग लिस्टच्या विविध प्रकारांची माहिती असल्यास योग्य नियोजन करून कन्फर्म तिकीट मिळण्याची शक्यता वाढवता येते.
GNWL (General Waiting List): सर्वाधिक प्राधान्य असलेली वेटिंग लिस्ट.सर्वाधिक प्राधान्य या यादीला दिले जाते. ही तिकीटे सहसा ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकापासून अंतिम स्थानकापर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असतात. या श्रेणीतील तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सर्वाधिक, साधारण 80 ते 90 टक्क्यांपर्यंत असते.
RLWL (Remote Location Waiting List): मधल्या स्थानकांसाठी वेटिंग लिस्ट. ही यादी मधल्या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी असते. GNWLच्या तुलनेत यामध्ये कन्फर्म होण्याची शक्यता कमी असली तरीही 40 ते 60 टक्क्यांपर्यंत अपेक्षा असते.
PQWL (Pooled Quota Waiting List): कमी अंतराच्या प्रवाशांसाठी. ही यादी सहसा कमी अंतराच्या प्रवासासाठी असते. या श्रेणीतील तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता तुलनेने कमी असून ती साधारण 20 ते 30 टक्क्यांपर्यंत असते.
RSWL (Roadside Waiting List): अत्यल्प शक्यता असलेली यादी. ही ट्रेनच्या सुरुवातीच्या स्थानकाजवळील प्रवाशांसाठी असते. या यादीतील तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अत्यल्प, साधारण 10 ते 20 टक्के इतकी असते.
TQWL (Tatkal Quota Waiting List): सर्वात कमी प्राधान्य असलेली यादी. मध्ये तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता अत्यंत कमी असते. कारण ही तिकीटे शेवटच्या क्षणी बुक केली जातात. त्यामुळे यामध्ये कन्फर्म होण्याची शक्यता 0 ते 10 टक्क्यांदरम्यानच असते.
RAC (Reservation Against Cancellation): यामध्ये प्रवासाची हमी मिळते पण सीट नंतर दिले जाते. तिकीटामध्ये पूर्ण सीट मिळत नाही, मात्र प्रवास करण्याची संधी मिळते. यात साइड लोअर सीट शेअर करावी लागते. नंतर सीट उपलब्ध झाल्यास पूर्ण सीट मिळण्याची शक्यता असते.
योग्य नियोजन कसे करावे?
जर तुम्हाला तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता वाढवायची असेल, तर शक्यतो GNWL (General Waiting List) श्रेणीत तिकीट बुक करा. तसेच, प्रवासाच्या तारखेच्या खूप आधी तिकीट आरक्षित करणे फायदेशीर ठरते. योग्य माहिती आणि नियोजनामुळे रेल्वे प्रवास अधिक सोयीस्कर आणि तणावरहित होऊ शकतो.