Tuesday, December 10, 2024 11:39:30 AM

Western Railway
पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगावे ते कांदिवली दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार अर्थात ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते ४.३० पर्यंत जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर ब्लॉक

पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक

मुंबई : पश्चिम रेल्वे सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी गोरेगावे ते कांदिवली दरम्यान गुरुवार आणि शुक्रवार अर्थात ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० ते ४.३० पर्यंत जाणाऱ्या आणि येणाऱ्या धीम्या मार्गावर चार तासांचा तसेच मध्यरात्री २ ते ३.३० या कालावधीत सर्व मार्गांवर दीड तासाचा ब्लॉक घेणार आहे. ब्लॉक काळात जलद मार्गावरील सर्व लोकल गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली आणि अंधेरी दरम्यान पाचव्या मार्गिकेवर धावतील. तसेच ब्लॉकच्या काळात निवडक लांब पल्ल्याच्या गाड्या दहा ते वीस मिनिटे उशिराने धावतील. काही लोकल गाड्या रद्द केल्या जातील अथवा त्यांच्या मार्गात बदल केला जाईल. प्रवाशांनी शक्य असल्यास ब्लॉक काळात प्रवास करणे टाळावे. 


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo