KDMC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! बंपर दिवाळी बोनस मिळणार, कुणाला किती रुपये मिळणार?

KDMC Diwali Bonus 2026 : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी आनंदाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या सणानिमित्त कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची चर्चा असून, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, कोणाला किती रक्कम मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण डोंबिवली बातम्या
KDMC Diwali Bonus

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ही आनंदाची ठरणार आहे. पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केलेला असून, आशा सेविकांनाही या बोनसचा लाभ मिळणार आहे. नेमका किती बोनस मिळणार आणि कोणाला किती रक्कम मिळणार, जाणून घ्या.

महापालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार
मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतला गेला. याच बैठकीला महापौर हर्षाली चौधरी, स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी सह म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे सरचिटणीस सचिन बासरे उपस्थित होते.

हेही वाचा – पेन्शन, LPG, ITR अन् मोबाईल कॉलिंगसह नोव्हेंबरमध्ये बदलणार ‘हे’ नियम; तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम?

किती रुपयांचा बोनस जाहीर?
कल्याण-डोंबिवली पालिकेने आपल्या कर्मचाऱ्यांना तब्बल 21 हजार रुपयांचा दिवाळी बोनस जाहीर केला आहे, तर दुसरीकडे आशा सेविकांना 6 हजार रुपये इतका बोनस मिळणार आहे, अशी माहिती समोर आलेली आहे.

दिवाळी बोनस कधी मिळणार?
सर्व कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये बोनसची रक्कम ही 6 नोव्हेंबरपर्यंत जमा होईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना या बोनसचा लाभ मिळणार आहे. ज्यामध्ये वर्ग 1 आणि वर्ग 2 चे अधिकारीही असून सर्व श्रेणीमधील कामगार, वाहन चालक, केडीएमसी, महापालिका शाळेतील शिक्षक तसेच विविध आरोग्य योजनेमधील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version