नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक मार्गात मोठे बदल; मुख्य रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?

31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक मार्गात मोठे बदल; मुख्य रस्ता राहणार बंद, पर्यायी मार्ग कोणते?
Nashik-Trimbakeshwar Traffic Update

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट येथे ध्वजारोहण होणार आहे. 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.

30 ऑक्टोबर सकाळी 8 ते 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कुशावर्त कुंड आणि नवीन घाट परिसरात ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून, नाशिक–त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता दिलेल्या कालावधीत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

हेही वाचा- मेट्रोने तळोजा गाठणं होणार सोपं; पहिली मेट्रो कधी धावणार?, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

त्यामुळे नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. यावेळी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नियमित 30 किलोमीटरचा मार्ग बंद राहणार असून त्याऐवजी 55 किलोमीटर पर्यायी मार्गाचे अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.

यादरम्यान अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर या पर्यायी मार्गांचा वापर करून त्र्यंबकेश्वरला पोहोचता येईल. या पर्यायी मार्गाचे अंतर सुमारे 55 किलोमीटर असल्याने वाहनचालकांना 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले असून, वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number