कल्याण- डोंबिवलीकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मानपाडा-काटई नाका ते तळोजा या तब्बल 18.40 किमी लांबीच्या मुंबई मेट्रो मार्गिका 12-अला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने अखेर मंजुरी दिलेली आहे. हा मेट्रो मार्ग प्रवाशांसाठी नेमका कधी सुरू होणार, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
मेट्रो प्रकल्पासाठी फडणवीसांनी ठरवली मुदत
एमएमआरडीएने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, या मार्गामुळे कल्याणसह डोंबिवली आणि नवी मुंबईतील कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारणा आहे. मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. ज्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच एमएमआरडीए आयुक्त डॉ.सजय मुखर्जी हेही उपस्थित असल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मार्ग पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे कडक निर्देश दिले आहेत.
किती स्थानके असतील?
हा मार्ग पूर्णपणे उन्नत असून त्यावर 12 स्थानके असणार आहे. ज्यामध्ये 6.93 किमीचा चारपदरी आणि 8.69 किमीचा सहापदरी उड्डाणपूल समाविष्ट केला आहे. दररोज सुमारे चार लाख 74 हजार प्रवासी या मार्गावरुन प्रवास करतील, असा अंदाज सांगण्यात येत आहे. त्यामुळे रस्ते प्रवासापेक्षा मोठी बचत होईल. काटई नारा येथे मेट्रो 12 आणि बुलेट ट्रेन, तर अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो 1 शी या मार्गाची जोडणी होणार आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update