“शेतकऱ्यांच्या मयतावर कोणी जाऊ नये” संजय गायकवाड पुन्हा बरळले

यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. अशातच दुष्काळग्रस्त परिस्थितीला कंटाळून जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी अजब विधान केले आहे.

“शेतकऱ्यांच्या मयतावर कोणी जाऊ नये” संजय गायकवाड पुन्हा बरळले
Sanjay Gaikwad

यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. पावसाअभावी खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेली पिके करपल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. याच तणावात शेतकरी जीवन संपवण्याचा मार्ग निवडत आहेत.

दुष्काळग्रस्त परिस्थितीला कंटाळून जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांवर आमदार संजय गायकवाड यांनी अजब विधान केले आहे. “जीवन संपवणाऱ्या शेतकऱ्यांच्या मयतावर कोणी जाऊ नये, जेव्हा शेतकऱ्याच्या मयताला कोणी जाणार नाही आणि त्यांची बॉडी जनावरे खातील तेव्हा शेतकऱ्यांच्या लक्षात येईल आणि ते आत्महत्या करणार नाही.” वाढत्या शेतकरी तणावावर संतापातून आमदार संजय गायकवाड यांचे विधान समोर आल आहे. शेतकऱ्याने आपल्या कुटुंबाची साथ द्यावी असं मध्येच सोडून जाऊ नये असंही ते यावेळी म्हणाले.

हेही वाचा- दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावले साईबाबा संस्थान! इतक्या कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपूर्द

गेल्या महिनाभरात 108 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले
राज्यात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा गर्तेत शेतकरी सापडला आहे. कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी मालाला भाव नाही आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर, या दुष्टचक्रात सापडल्याने गेल्या 9 महिन्यांत तब्बल 760 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यातच दररोज सरासरी तीनहून अधिक, म्हणजे तब्बल 108 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या अहवालातून समोर आले आहे. यंदा पावसाने मोठी दडी मारल्याने पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

सप्टेंबरमध्ये सर्वाधिक 108 नोंद झाली.
जिल्हानिहाय आकडेवारीनुसार,
बीडमध्ये 170,
छत्रपती संभाजीनगरमध्ये 154,
धाराशिवमध्ये 100,
नांदेडमध्ये 98,
जालन्यात 71,
लातूरमध्ये 56
परभणी 56
हिंगोली 55

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number