महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
live update maharashtra

LIVE NEWS & UPDATES

  • 30 Oct 2026 08:08 AM (IST)

    पट्टणकोडोलीच्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत पाच लाखाहून अधिक भाविकभक्तांची उपस्थिती, पन्नास टनाहून अधिक भंडऱ्याच्या उधळणीत फरांडेबाबांची भाकणूक संपन्न

    हातकणंगले तालुक्यातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, आणि मध्यप्रदेशासह देशभर प्रसिद्ध असणाऱ्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत पाच लाखाहून अधिक भाविकभक्तांच्या उपस्थितीत फरांडे बाबांच्या भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला. 50 टनाहून अधिक भंडारा, खारीक, खोबरे आणि लोकरीची मुक्त उधळण करत या यात्रेला आता सुरवात झाली आहे

  • 30 Oct 2026 07:43 AM (IST)

    मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा होत असल्याचा शेतकरी शेतमजूर महिलांचा आरोप

    हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजाळी या गावात शेतकरी व शेतमजूर महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतली आहेत. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात उत्पन्न नाही, हाताला काम नसल्याने या महिला आर्थिक अडचणी सापडल्या आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप या गावातील महिलांनी केला आहे

  • 30 Oct 2026 07:39 AM (IST)

    कुंभ ध्वजारोहणाच्या पूर्वसंध्येला नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमा; रामकुंडावर १ लाख दिव्यांचा दीपोत्सव

    कुंभ ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आज नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता तपोवनातून परिक्रमेला सुरुवात होणार असून, श्री काळाराम मंदिरातून कुंभमेळ्याचा मुख्य ध्वज आणला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता परिक्रमा रामकुंडावर पोहोचल्यानंतर महाआरती आणि त्यानंतर १ लाख दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे.

  • 30 Oct 2026 07:33 AM (IST)

    महाराष्ट्रात ९ महिन्यांत रस्ते अपघातांत ११,३२६ मृत्यू; मुंबईत २६० जणांचा बळी

    महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या ९ महिन्यांत २६,९१५ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ११,३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत २४८ प्राणघातक अपघातांत २६० जणांनी जीव गमावला. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, धोकादायक मार्गांवर सुरक्षा उपाय आणि अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.

  • 30 Oct 2026 07:29 AM (IST)

    गणवेशात मद्यप्राशन करून गाडी चालवल्याच्या आरोपावरून महिला पोलीस कर्मचारी निलंबित

    अश्विनी केकान यांच्यावर पोलीस विभागाची कारवाई; मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. शेवाळवाडी येथील रामानंद हॉटेलसमोरील रस्त्यावर मद्यप्राशन करून गाडी चालवल्याचा आरोप. विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारणे आणि थेट फुटपाथवर गाडी चढवल्याचा आरोप. नंबर प्लेट नसलेल्या राखाडी रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली. वाहनचालक आणि नागरिकांना शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल.

  • 30 Oct 2026 07:22 AM (IST)

    एमआयडीसीच्या गोदाममधील धान्य घोटाळा; कडक कारवाईचे निर्देश - मंत्री जयकुमार रावल

    ​धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील बैसाणे यांच्या माध्यमातून एमआयडीसीच्या गोदाममधील धान्यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
    ​या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD/CMD) डिगेगावकर साहेब यांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

  • 30 Oct 2026 07:21 AM (IST)

    धुळे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती गंभीर; पालकमंत्र्यांचे बँकांना कर्जवसुली न करण्याचे आणि पोलिसांना सावकारांवर कठोर कारवाईचे निर्देश

    पावसाने पाठ फिरवल्यामुळे धुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली करू नये आणि खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी. या बैठकीला आमदार राघवेंद्र भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  • 30 Oct 2026 07:21 AM (IST)

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होणार समृद्धी महामार्गावर रास्ता रोको

    दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असून,पोलिसांनी मात्र या आंदोलकांना आंदोलनाची परवानगी नाकारली असून ,या करीता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, मात्र तरीही आंदोलक महामार्ग अडवण्यावर ठाम असून,उबाठाचे आमदार नितीन देशमुख ,आमदार सिद्धार्थ खरात ,आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे आंदोलन होणार आहे

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number