मालेगाव महापालिकेचे आयुक्त आणि धुळे महापालिकेचे माजी सहाय्यक उपायुक्त रवींद्र जाधव यांच्यावर नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुरुवारी लाचखोरीप्रकरणी मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून, उशिरापर्यंत त्यांच्या निवासस्थानी घरझडती घेण्याचे सत्र सुरू होते.
या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असतानाच, कायद्यातील सक्षम अधिकाऱ्यांच्या तरतुदींसह तीन महत्त्वाच्या तांत्रिक मुद्द्यांचा विचार करून या गुन्ह्याचा तपास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे.
एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदा पर्जन्यमान कमी राहिल्याने शेती पिकांसह चारा उत्पादनालाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधीच चारा टंचाईची चिंता सतावत असताना आता बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे वातावरणात बदल होत असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी दिसून येत आहे. काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली आहे.
हातकणंगले तालुक्यातील महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, आणि मध्यप्रदेशासह देशभर प्रसिद्ध असणाऱ्या श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत पाच लाखाहून अधिक भाविकभक्तांच्या उपस्थितीत फरांडे बाबांच्या भाकणुकीचा कार्यक्रम संपन्न झाला. 50 टनाहून अधिक भंडारा, खारीक, खोबरे आणि लोकरीची मुक्त उधळण करत या यात्रेला आता सुरवात झाली आहे
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वाघजाळी या गावात शेतकरी व शेतमजूर महिलांनी मायक्रो फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतली आहेत. परंतु सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतात उत्पन्न नाही, हाताला काम नसल्याने या महिला आर्थिक अडचणी सापडल्या आहेत. अशा दुष्काळी परिस्थितीत मायक्रो फायनान्स कंपनीचे कर्मचारी कर्जाचे हप्ते वसुलीसाठी तगादा लावत असल्याचा आरोप या गावातील महिलांनी केला आहे
कुंभ ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वसंध्येला आज नाशिकमध्ये भव्य नगरपरिक्रमेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ वाजता तपोवनातून परिक्रमेला सुरुवात होणार असून, श्री काळाराम मंदिरातून कुंभमेळ्याचा मुख्य ध्वज आणला जाणार आहे. सायंकाळी ७ वाजता परिक्रमा रामकुंडावर पोहोचल्यानंतर महाआरती आणि त्यानंतर १ लाख दिव्यांचा दीपोत्सव होणार आहे.
महाराष्ट्रात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या ९ महिन्यांत २६,९१५ रस्ते अपघातांची नोंद झाली असून, यात ११,३२६ जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत २४८ प्राणघातक अपघातांत २६० जणांनी जीव गमावला. अपघात रोखण्यासाठी वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी, धोकादायक मार्गांवर सुरक्षा उपाय आणि अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याची गरज व्यक्त होत आहे.
अश्विनी केकान यांच्यावर पोलीस विभागाची कारवाई; मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल. शेवाळवाडी येथील रामानंद हॉटेलसमोरील रस्त्यावर मद्यप्राशन करून गाडी चालवल्याचा आरोप. विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, समोरून येणाऱ्या वाहनांना कट मारणे आणि थेट फुटपाथवर गाडी चढवल्याचा आरोप. नंबर प्लेट नसलेल्या राखाडी रंगाच्या मारुती सुझुकी बलेनो गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली. वाहनचालक आणि नागरिकांना शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल.
धुळे महानगरपालिकेचे नगरसेवक सुनील बैसाणे यांच्या माध्यमातून एमआयडीसीच्या गोदाममधील धान्यामध्ये काही भ्रष्टाचार झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, या प्रकरणी गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे.
या घोटाळ्याबाबत बोलताना ते म्हणाले की, वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक (MD/CMD) डिगेगावकर साहेब यांना या प्रकरणी कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पावसाने पाठ फिरवल्यामुळे धुळे जिल्ह्यात निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांनी प्रशासनाला तातडीच्या उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले की, बँकांनी शेतकऱ्यांची सक्तीने कर्जवसुली करू नये आणि खासगी सावकारांच्या छळाविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी. या बैठकीला आमदार राघवेंद्र भदाणे, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकरिता आज शिव सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर रास्ता रोको करण्यात येणार असून,पोलिसांनी मात्र या आंदोलकांना आंदोलनाची परवानगी नाकारली असून ,या करीता तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे, मात्र तरीही आंदोलक महामार्ग अडवण्यावर ठाम असून,उबाठाचे आमदार नितीन देशमुख ,आमदार सिद्धार्थ खरात ,आमदार गजानन लवटे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये हे आंदोलन होणार आहे
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.