सोलापूर-तुळजापूर महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. हा महामार्ग तब्बल 3 दिवस वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. हा मोठा निर्णय नेमका कधीपासून लागू होणार, महामार्ग बंद ठेवण्यामागचं नेमकं कारण काय आहे आणि प्रवाशांसाठी कोणते पर्यायी मार्ग उपलब्ध असतील, जाणून घ्या सविस्तर.
नेमकं कारण काय
मिळालेल्या माहितीनुसार, कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी सोलापूरहून तुळजापूरला पायी जात असलेल्या भाविकांची मोठी गर्दी होत असते. भाविकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी याबाबत आदेश जारी केलेला आहे.
किती वाजल्यापासून निर्बंध लागू
23 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 1 वाजल्यापासून ते 26 ऑक्टोबर 2026 च्या रात्री साधारण 12 वाजेपर्यंत हा जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर हा मुख्य मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद असणार आहे. पण पोलीस वाहने, अत्यावश्यक सेवा, विशेष परवानगी असलेल्या वाहनांना यामधून सूट देण्यात आलेली आहे.
असे असतील पर्यायी मार्ग
सोलापूर-तुळजापूर महामार्ग हा बंद असल्याने सर्व वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग देखील जाहीर करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसाठी बाळे गाव-बार्शी-येरमाळा, धाराशिवसाठी बार्शी-वैराग, तर लातूरसाठी बार्शी-येडशी-ढोकी-मुरुड या मार्गांचा वापर करावा, तुळजापूरसाठी मार्केट यार्ड-बोरामणी-इटकळ-मंगरूळ पाटी हा पर्यायी मार्ग असून सांगण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.