पत्नीची साथ, तीन मुलांचा आधार! घरासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, शेतीच्या मशीनने…

Farm Accident in Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात शेतीकामादरम्यान दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. या घटनेत 37 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या प्रकरणाची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.

पत्नीची साथ, तीन मुलांचा आधार! घरासाठी राबणाऱ्या शेतकऱ्यावर काळाचा घाला, शेतीच्या मशीनने…
Jalgaon News

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडलेली आहे. मका काढणीच्या मशीनमध्ये अडकून 37 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. योगेश भावालाल पाटील असे या मृत शेतकऱ्याचे नाव असून ते भागदरा शिवारातील रहिवासी होते.

शेतीच्या मशीनने कुटुंबाचा आधारच हिरावला
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी साधारण सकाळी 11 वाजेच्या दरम्यान ही दुर्घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. शेतकरी दिशेन महाजन यांच्या शेतामध्ये मका काढणीचे काम सुरु होते. योगेश पाटील हे स्वत: मशीन चालवत होते. शेतीकाम करत असताना ते मशीनमध्ये अडकले गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. योगेश पाटील हे शेतीसोबत मका काढणी मशीन चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.

हेही वाचा – दुहेरी हत्याकांडाने खळबळ! चहा विक्रेत्याला गोळ्या झाडून संपवलं, तर पळून जाणाऱ्या पत्नीच्या डोळ्यातही झाडली गोळी

पत्नी अन् तीन मुलांवर दुःखाचा डोंगर
कष्टाने संसार चालवणाऱ्या योगेश यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झालाय. योगेश यांच्या पाठी त्यांची पत्नी आणि तीन लहान मुले आहेत. त्यांच्या मृत्यूने तीन मुलांच्या डोक्यावरील पितृछत्र कायमचे हरपले आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसांनी ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

महाराष्ट्र ते देश-विदेश, ताज्या घडामोडी एका क्लिकवर

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number