जंतरमंतर आंदोलनाआधी मोठी कारवाई; अभिजीत दीपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं

ध्रुव राठी यांच्या अटकेची बातमी व्हायरल होत असतानाच CJP कार्यकर्त्यांबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे. अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना पोलिसांनी विमानात जाऊन ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.
जंतरमंतर आंदोलनाआधी मोठी कारवाई; अभिजीत दीपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं

ध्रुव राठीला अटक केल्याची बातमी काही वेळा पूर्वीच आली असतानाच आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पोलिसांनी थेट विमानात जाऊन ताब्यात घेतल्याची माहिती सध्या मिळत आहे. फक्त अभिजीत दिपके नाही तर त्यांच्यासह आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जंतर-मंतरवरील आंदोलनापूर्वीच CJP च्या कार्यकर्त्यांवर कारवाई सुरु झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीने आंदोलन पुकारले आहे. यात आंदोलनासाठी प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठी भारतात आला होता. दरम्यान, सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. सीजेपीनं सोशल मीडियावर दावा केला आहे की, ध्रुव राठी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुरुग्राम येथील घरातून दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सीजेपीने म्हटले आहे. सीजेपी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरच ही कारवाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याला अजूनही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. दिल्ली पोलिसांकडूनही याबाबत कोणतेबही स्पष्टीकरण आलेले नाही.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version