रायगड / माथेरान : माथेरानला भेट देण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे. माथेरानची ओळख असलेली आणि पर्यटकांचे विशेष आकर्षण असलेली मिनी ट्रेन अर्थात ‘टॉय ट्रेन’ 20 ऑक्टोबरपासून पुन्हा रुळांवर धावणार आहे. दिवाळीच्या पर्यटन हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही सेवा सुरू होणार असल्याने पर्यटकांसह माथेरानमधील नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
निसर्गरम्य डोंगररांगा, हिरवीगार वनराई आणि घाटातील वळणावळणाचा रेल्वेमार्ग यामुळे माथेरानची मिनी ट्रेन पर्यटकांसाठी खास आकर्षण ठरते. त्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
नेरळ ते माथेरान दोन फेऱ्या
मिळालेल्या माहितीनुसार, 20 ऑक्टोबरपासून नेरळ ते माथेरान आणि माथेरान ते नेरळ अशा प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या फेऱ्यांमुळे पर्यटकांना प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
मिनी ट्रेनचे वेळापत्रक काय?
नेरळ ते माथेरान
माथेरान ते नेरळ
शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल होणार?
मिनी ट्रेन पुन्हा सुरू झाल्यानंतर अमन लॉज ते माथेरानदरम्यान नियमित धावणाऱ्या शटल सेवेच्या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
दुसरीकडे, शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त विशेष फेऱ्या चालवण्याचाही मध्य रेल्वेचा विचार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे दिवाळीच्या पर्यटन हंगामात माथेरानला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी मिनी ट्रेनचा प्रवास अधिक सोयीचा ठरण्याची अपेक्षा आहे.